This Bollywood Actresses Got Pregnant At 40 : बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ व विकी कौशल यांनी नुकतीच २३ सप्टेंबर रोजी ते आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावरून शेअर केली. त्यानंतर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

कतरिना व विकी कौशल यांनी २०२१ मध्ये लग्न केलं. दोघांनी लग्नाच्या साडे तीन वर्षांनंतर आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. कतरिना व विकीमध्ये सहा वर्षांचं अंतर आहे. विकी ३७ वर्षांचा तर कतरिना ४२ वर्षांची आहे. तिने वयाच्या ४२ व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला. पण, वयाच्या चाळिशीत आई होण्याचा निर्णय घेणारी कतरिना कैफ पहिली अभिनेत्री नाही; तर तिच्या आधीसुद्धा बॉलीवूडमधील काही अभिनेत्रींनी वयाच्या चाळिशीत हा निर्णय घेतला आणि आता त्या मातृत्व अनुभवत आहेत. चला तर जाणून घेऊयात कोण आहेत या अभिनेत्री…

‘या’ अभिनेत्रींनी वयाच्या चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

करीना कपूर

करीना कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांत काम करत तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. करीनाने सैफ अली खानबरोबर लग्न केल्यानंतर ती २०१६ मध्ये वयाच्या ३६ व्या वर्षी पहिल्यांदा आई झाली. त्यानंतर अभिनेत्रीने २०२१ मध्ये वयाच्या चाळिशीत तिचा दुसरा मुलगा जेहला जन्म दिला.

बिपाशा बासू

बिपाशा बासूने २०१६ मध्ये अभिनेता करण सिंह ग्रोवरबरोबर लग्न केलं होतं. त्यानंतर अभिनेत्रीने लग्नाच्या साडे सहा वर्षांनंतर तिच्या मुलीला देवीला जन्म दिला. बिपाशाने वयाच्या ४३ व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला.

दिया मिर्झा

दिया मिर्झा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. करीना कपूर, बिपाशा बासूप्रमाणे तिनेही वयाच्या चाळिशीत आई होण्याचा निर्णय घेतला. दियाने ४० व्या वर्षी तिच्या मुलाला जन्म दिला.

अनिता हसनंदानी

अनिता हसनंदानी ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अनितानेसुद्धा ती ४० वर्षांची असताना आई होण्याचा निर्णय घेतला आणि तिचा मुलगा आरवला जन्म दिला.