बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये या दोघांच्या चर्चा सुरु आहेत. बॉलिवूडचं फेव्हरेट कपल म्हणून यांच्याकडे बघितले जाते. दोघे बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये एकत्र जाताना दिसतात. आता दोघे एकत्र एका जाहिरातीत दिसले आहेत.

कियारा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. आपल्या फोटोजमधून ती चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतीच तिने सिद्धार्थबरोबरची जाहिरात आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही जाहिरात एका खाद्यविकी करणाऱ्या कंपनीची आहे. त्यांच्या या जाहिरातीवर चाहत्यांनी कमेंट्सच वर्षाव केला आहे.

“कलाकारांनी घाबरून काम करणं बंद केलं तर…”; ऐतिहासिक भूमिकांच्याबाबतीत स्पृहा जोशीचे परखड मत

हे दोघे दिल्लीत लग्न करणार होते, मात्र मात्र आता ते त्यांनी त्यांच्या लग्नस्थळ बदललं आहे. त्यांचे नातेवाईक आणि जवळची मित्रमंडळी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.कियारा आणि सिद्धार्थ यांचा विवाह सोहळा चंदीगड येथे पार पडणार असल्याचं ‘फिल्मफेअर’ने त्यांच्या एका वृत्तात सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कियारा व सिद्धार्थने ‘शेरशाह’ चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. त्यांच्या ऑन स्क्रीन जोडीला चाहत्यांनीही पसंती दर्शविली होती. तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंग व लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. कियारा नुकतीच ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात झळकली आहे तर सिद्धार्थ’ थँक गॉड’ या चित्रपटात दिसला आहे.