बॉलिवूडमधील लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडपं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा विवाह बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहेत. गेले अनेक महिने ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्यांची लगीन घाटिका समीप आली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते फार उत्सुक आहेत. आता अशातच कियाराचा ब्रायडल लूकमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न होत आहे. परवा यांच्या लग्नाची मेहंदी, काल हळद आणि संगीत समारंभ पार पडला. तर आज संध्याकाळी ही दोघं बोहल्यावर चढणार आहेत. आता त्यांचं लग्न लागायच्या आधीच कियारा अडवाणीचा ब्रायडल लूकमधील एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कियारा लाल रंगाचा घागरा घालून नव्या नवरीसारखी नटलेली दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी गोंधळून गेले. अनेकांना हा व्हिडीओ सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा असल्याचं वाटलं. परंतु हा व्हिडीओ कियाराच्या एका जाहिराती दरम्यानचा आहे. आता या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्यांच्या लग्नाचे फोटो कधी पाहायला मिळणार असा प्रश्न विचारत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी कियाराच्या लूकचंही कौतुक केलं.
दरम्यान आज दुपारी २ ते ४ दरम्यान ही दोघं विवाहबद्ध होतील. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये सर्वत्र झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना राजस्थानी नृत्याचा आनंद घेता यावा यासाठी राजस्थानी नृत्य करणारे कलाकारही बोलवण्यात आले आहेत. सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात रंगणार आहे. या लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे.