बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा सर्वात मोठा चाहता मोहम्मद अशरफ याचे निधन झाले आहे. मोहम्मद अश्रफ यानीच ‘SRK युनिव्हर्स’ या शाहरुखच्या सर्वात मोठ्या फॅनक्लबची सुरूवात केली होती. आज हेच फॅनक्लब ३५ देशांमध्ये पसरलेला आहे. मोहम्मद अशरफ याच्या निधनामुळे शाहरुखबरोबरच त्याच्या इतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद गेल्या दीड वर्षांपासून आजारी होता. पण त्याला काय त्रास होता हे अद्याप कळू शकलेले नाही.

३१ जुलै रोजी त्याचे निधन झाले. मालदीवमध्ये राहणारा मोहम्मद अशरफ हा शाहरुखचा जबरदस्त मोठा चाहता होता. त्याने शाहरुखच्या प्रेमाखातर त्याच्या चाहत्यांचा एक मोठा फॅनक्लब सुरू केलं अन् या अंतर्गत तो शाहरुखच्या चित्रपटांचा फर्स्ट डे फर्स्ट शो नियमित आयोजीत करायचा.

आणखी वाचा : तब्बल ५७ फ्लॉप चित्रपट अन् निर्मात्यांचं १००० कोटींचं नुकसान करणारा सर्वात मोठा सुपरस्टार कोण? जाणून घ्या

शाहरुखशी संबंधीत कोणताही कार्यक्रम असला की मोहम्मद तो दिवस अक्षरशः एखाद्या सणासारखा साजरा करायचा. शाहरुखच्या चित्रपटासाठी तो संपूर्ण चित्रपटगृहच बुक करायचा. इतकंच नव्हे तर शाहरुखच्या वाढदिवशीसुद्धा मोहम्मद काहीतरी सरप्राइज ठेवायचा. मोहम्मद शाहरुखला बऱ्याचदा भेटलाही आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खुद्द शाहरुखनेही त्याची दखल घेत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘SRK Universe’चे ट्विटरवर ५ लाख ५७ हजारपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. असं म्हंटलं जातं की मोहम्मद मालदीवहून स्वतःच्या खर्चाने शाहरुखचे चित्रपट पाहण्यासाठी अन् त्याचे आयोजन करण्यासाठी भारतात यायचा. मोहम्मद मालदीवमधील एका कंपनीमध्ये एचआर डिपार्टमेंटमध्ये काम करायचे, पण सोशल मीडियावर त्याची लोकप्रियता त्याच्या फॅनक्लबमुळे वाढली.