scorecardresearch

सिद्धार्थ मल्होत्रा पत्नी कियारा अडवाणीला ‘या’ नावांनी मारतो हाक; ‘कॉफी विथ करण’मध्ये अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला…

‘कॉफी विथ करण’च्या अगामी भागात सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन लावणार हजेरी

sidharth-malhotra-and-kiara-advani
कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्रा

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी बी टाऊनमधील लोकप्रिय दाम्पत्य आहे. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सिद्धार्थ आणि कियारा करिअरबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतात. नुकत्याच एका कार्यक्रमात सिद्धार्थने तो कियाराला कोणत्या नावाने हाक मारतो याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- शाहरुख खानच्या लेकाला पाहून दीपिका पदुकोणने केलं असं काही…; दोघांचं बॉण्डिंग पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘जवान’मधील ‘तो’ सीन

Avdhoot
‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये स्पृहा जोशीच्या ऐवजी दिसणार रसिका सुनील, प्रतिक्रिया देत निर्माता अवधूत गुप्ते म्हणाला, “मी तिला…”
kumar-sanu
वडिलांच्या निधनाच्या दिवशी कुमार सानू यांनी दिलेला आयुष्यातील सर्वात बेस्ट परफॉर्मन्स; म्हणाले, “मी हास्य…”
kiara advani got emotional at her haldi ceremony
हळदी समारंभात भावुक झाली होती कियारा अडवाणी, प्रसिद्ध संगीतकाराचा सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाबद्दल खुलासा
big boss fame actress ruchira jadhav reply to trolls
“बाकीच्या मंडळांचे देव पण पावतात”, लालबागच्या राजाच्या दर्शनावरून ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्रीने दिलं उत्तर, म्हणाली…

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझन सुरू आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन हजेरी लावणार आहेत. करणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या भागाचा प्रोमोही शेअर केला आहे. या भागात सिद्धार्थ आणि वरुण आपल्या करिअरबाबत अनेक खुलासे करताना दिसत आहेत. ११ वर्षांपूर्वी सिद्धार्थ आणि वरुणने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

हेही वाचा- Animal Trailer: ठरलं! ‘या’दिवशी येणार रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर; दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांची पोस्ट व्हायरल

या भागात करण सिद्धार्थला विचारतो की, अशी कोणती तीन नावे आहेत; ज्यांचा वापर करीत तू तुझ्या बायकोला हाक मारतोस? करणसे असे विचारल्यावर उत्तर देत सिद्धार्थ म्हणाला की, मी कियाराला लव, की व बे या नावांनी हाक मारतो. सिद्धार्थचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सिद्धार्थ आणि कियाराच्या कामकाजाबाबत बोलायचे झाले, तर काही महिन्यांपूर्वीच कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्याबरोबर कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने खूप कमी कमाई केली होती. आता लवकरच ती साऊथचा सुपरस्टार राम चरणबरोबर ‘गेम चेंजर’ चित्रपटात झळकणार आहे.

हेही वाचा- “मी आईला स्क्रीनवर पाहतो तेव्हा…” मिथुन चक्रवर्ती यांचा सुपुत्र नमाशीचे आई योगिता बालीबद्दलचे विधान चर्चेत

तर, सिद्धार्थ ‘योद्धा’ चित्रपटात झळकणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट १५ मार्च २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थबरोबर दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘भारतीय पुलिस बल’ चित्रपटाच्या माध्यमातून ओटीटवर पदार्पण करणार आहे. १९ जानेवारीला हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थबरोबर शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय, श्वेता तिवारी, निकितिन धीर, ऋतुराज सिंह, मुकेश ऋषी व ललित परिमू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Koffee with karan 8 sidharth malhotra revealed what he calls kiara advani in karan johar show dpj

First published on: 21-11-2023 at 13:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×