अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनॉन यांचा बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या शुटींगपासून प्रभास आणि क्रितीच्या नात सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. ही दोघं एकमेकांना डेट करत आहेत असंही बोललं जात होतं. ‘आदिपुरुष’च्या टीझर लॉन्चच्या वेळी त्यांची केमिस्ट्री आणि त्यांच्यातला बाँड पाहून ते खरोखर एकमेकांना डेट करत आहेत असंच त्यांच्या चाहत्यांना वाटलं. डेटिंगच्या या बातम्यांमध्ये आता क्रितीने आता प्रभासच कौतुक केलं आहे. क्रितीकडून आपलं कौतुक ऐकून प्रभास लाजताना दिसला.

हेही वाचा- सलमान खान ठरला भारतातील सर्वात महागडा टीव्ही स्टार; ‘बिग बॉस’च्या एका भागासाठी घेतो तब्बल ‘एवढे’ कोटी रुपये

आदिपुरुष सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं ई टाइम्सला क्रितीनं मुलाखत दिली. त्यावेळी क्रितीनं प्रभासबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या. या गोष्टी सांगत असताना तिनं प्रभासबद्दल भरभरून कौतुक केलं. ती म्हणाली की, प्रभास हा जमिनीवर पाय असलेला अभिनेता आहे. क्रितीनं प्रभासच्या एका गोष्टीचं भरभरून कौतुक केलं.

क्रिती म्हणाली की, “मी असं ऐकलं होतं की तो स्वतःमध्ये मग्न असतो. पररंतु मी जेव्हा त्याला भेटले तेव्हा मला तो लाजाळू स्वभावाचा व्यक्ती वाटला. मी सुरुवातीला त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. मी त्याला सांगितलं की, माझा पहिला सिनेमा तेलुगु होता. माहिती नसलेल्या भाषेतील सिनेमा अभिनय करणं हे खूप कठीण होतं. हे मी सगळं मी त्याला सांगितल्यावर तो हळूहळू माझ्याशी खुलून बोलू लागला.”

क्रिती पुढं म्हणाली “प्रभास हा अतिशय साधाा आणि जमिनीवर असलेला कलाकार आहे. त्याचे डोळे हे खूपच बोलके आहेत. त्याचा स्वभावही खूपच शांत आहे. त्याचा हा स्वभाव पाहून त्याच्या शिवाय प्रभू श्रीरामाची भूमिका अन्य कुणी साकारू शकतो यावर मी विश्वास ठेवू शकणार नाही.”

हेही वाचा- “मला पुन्हा कधीच…”सुशांतच्या आठवणीत सारा अली खान भावुक, अनसीन फोटो शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगही फुल्ल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही चित्रपटगृहांमध्ये आदिपुरुषच्या फर्स्ट डे फर्स्ट शोच्या एक तिकीटासाठी प्रेक्षकांना २ हजार रुपयांना मोजावे लागणार आहेत. दिल्लीच्या PVR मध्ये तिकीटाची किंमत खूप जास्त आहे. तसेच दिल्लीतील PVR सिलेक्ट सिटी वॉक गोल्डमध्ये तिकिटाची किंमत रु १८०० रुपये आहे. या दोन्ही चित्रपटगृहांमधील पहिल्या दिवसाच्या शोची संपूर्ण तिकिटे विकली गेली आहेत. तसेच एडाच्या पीव्हीआर गोल्ड, लॉजिक्स सिटी सेंटरमध्ये आदिपुरुषचं एक तिकिट 1650 रुपयांना आहे.PVR Gold Logix तर याच चित्रपटगृहामध्ये फ्लॅश तिकिटाची किंमत ११५० रुपये असल्याचे सांगण्यात येत