‘पठाण’ चित्रपट आणि त्यातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू झालेला वाद हा काहीकेल्या थांबायचं नाव घेत नाहीये, त्यातच आता या चित्रपटातील दुसरे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. ‘झुमे जो पठाण’ हे या चित्रपटातील दुसरं गाणं नुकतंच यश राज फिल्म्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट आणि युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातही शाहरुख आणि दीपिका यांची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्यावर अभिनेता निर्माता कमाल आर खान अर्थात केआरकेने टीका केली आहे.

सातत्याने बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके हा सतत चर्चेत असतो. नुकतीच त्याने ‘झुमे जो पठाण’ या गाण्यावर टीका केली आहे. त्याने आपल्या ट्वीटवर अकाऊंटनवरून असे म्हंटले आहे, “मी नुकतेच ‘झूम जो पठाण’ हे गाणे पाहिले आणि आता मी म्हणू शकतो की बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कोणीही वाचवू शकत नाही. शाहरुख भारतीय प्रेक्षकांसोबत पूर्ण पंगा घेत आहे. पठाण श्रेष्ठ हे दाखवण्याचा तो प्रयत्न करत आहे आणि बाकी सर्वजण त्याच्यासमोर सगळे छोटे आहेत. शाहरुख जी, हा भारत आहे, पाकिस्तान नाही.” अशा शब्दात त्याने टीका केली आहे.

आई दिग्गज अभिनेत्री तरी लेकीला काम मिळवण्यासाठी करावा लागला संघर्ष; म्हणाली, “भाग्यश्रीची मुलगी असल्याने…”

शाहरुख खानने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या नवीन गाण्याचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला होता. हे गाणं हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा ३ भाषांमध्ये बघायला मिळणार आहे. आधीच्या गाण्यात आपल्याला फक्त दीपिकाचा मोहक अदा आणि शाहरुखची थोडी झलक बघायला मिळाली होती. या नव्या गाण्यात मात्र दीपिकाबरोबर शाहरुखसुद्धा थिरकताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पठाण’ २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. शाहरुख, दीपिकाबरोबरच जॉन अब्राहमही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.