‘थ्री इडियट्स’ फेम ज्येष्ठ अभिनेते अखिल मिश्रा यांचं २१ सप्टेंबर २०२३ रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाला आता सहा महिने झाले आहेत. अखिल यांची पत्नी सुझान बर्नर्ट आता दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. सुझानने याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम सुझान अर्जुन हरदाससोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुन एका एनजीओमध्ये काम करतात. याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुझान म्हणाली, “अखिलच्या निधनानंतर मी कामाशिवाय कुणालाच भेटायचे नाही. मी माझ्या घरातच राहायचे. पण गेल्या डिसेंबरमध्ये एका मित्राच्या हाऊसवॉर्मिंग पार्टीत सहभागी होण्यासाठी मी दिल्लीला गेले. तिथेच मी अर्जुनला भेटले. लवकरच आमची मैत्री झाली आणि हळूहळू जवळीक वाढली. आता आम्ही भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेले आहोत, असं वाटतं जणूकाही आम्ही खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो.”

प्रियांका चोप्राची बहीण झाली केजरीवालांची सून! मीराने ४० व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाली…

पतीच्या निधनानंतर आयुष्यात पुढे जाताना येणाऱ्या आव्हानांबद्दल सुझान म्हणाली, “आज मी जे काही आहे ते अखिलमुळेच आहे हे अर्जुनला माहीत आहे. अखिल हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे याची त्याला जाणीव आहे आणि त्याची जागा घेण्याचा अर्जुनचा हेतू नाही. अखिल हा माझा आवडता होता, तो एक अद्भुत माणूस होता.”

१७ व्या वर्षी सोडलं घर, चाळीत राहून केला संघर्ष, नकारामुळे आत्महत्येचे विचार अन्…; आता एका चित्रपटासाठी कोट्यवधी आकारतो ‘हा’ अभिनेता

अर्जुन सध्या सुझानच्या आईला भेटण्यासाठी तिच्याबरोबर जर्मनीत आहेत. सुझानच्या आईवर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे. “आम्ही नुकताच एकत्र वेळ घालवायला आणि एकमेकांना जाणून घ्यायला सुरुवात केली आहे. हे नातं दीर्घकाळ टिकावं, असा आम्ही विचार करत आहोत.”

“तुम्ही शूद्र मनाचे अतिशय शूद्र माणूस आहात,” म्हणणाऱ्या युजरला शरद पोंक्षेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “मराठी…”

कामाबद्दल बोलायचं झाल्यास सुझान ‘प्यार का पहला नाम: राधा मोहन’मध्ये दिसली होती. तिने ‘झाशी की रानी’, ‘संस्कार लक्ष्मी’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ या मालिकांमध्ये काम केलंय. त्याशिवाय ‘नो प्रॉब्लेम’, ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ आणि तेलुगु चित्रपट ‘यात्रा २’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Late actor akhil mishra wife suzanne bernert finds love again in arjun hardas hrc
First published on: 15-03-2024 at 17:39 IST