अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भलैया ३’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटासंदर्भात नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आता कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटात ९०च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

काल, १२ फेब्रुवारीला कार्तिक आर्यनने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटात ऑरिजनल मंजुलिका म्हणजे अभिनेत्री विद्या बालनची एन्ट्री होणार असल्याची माहिती कार्तिकने सोशल मीडियाद्वारे दिली. आता मंजुलिकासह आणखी एक भूत रूह बाबाला टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचे समोर आलं आहे. या भूताची भूमिका ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

aishwarya narkar favorite actor arun sarnaik (1)
ऐश्वर्या नारकर ७० च्या दशकातील ‘या’ मराठी अभिनेत्याच्या आहेत चाहत्या, आवडता चित्रपट अन् गाणं जाणून घ्या…
Cannes Film Festival
‘‘…तर भूमिकेचा आत्मा सापडतो’’
kan award
पायल कपाडियाची ऐतिहासिक कामगिरी; ‘कान’मध्ये ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ला ‘ग्रां प्री’ पुरस्कार
_Morgan spurlock exposes fast food industry
‘मॅकडोनाल्ड’ कंपनीला दणका देणारे मॉर्गन स्परलॉक कोण होते?
rasika vengurlekar and these marathi actors cast on bollywood movie munjya
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीचं नशीब उजळलं! बॉलीवूडमध्ये मिळाली संधी; चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी
Triptii Dimri replaces Samantha Ruth Prabhu in allu arjun pushpa 2
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात समांथा प्रभूची जागा घेणार ‘ही’ अभिनेत्री? रणबीर कपूरसह इंटीमेट सीन देऊन रातोरात झाली नॅशनल क्रश
maidaan OTT Release
अजय देवगणचा ‘मैदान’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यावर एकाच महिन्यात आला OTT वर; पण आहे ‘हा’ मोठा ट्विस्ट
actor shreyas talpade talks about movie kartam bhugtam
‘चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणे हेच यश’

हेही वाचा – अरबाज खानच्या दुसऱ्या पत्नीचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं होतं हॅक, म्हणाली, “माझ्यासाठी हा अनुभव…”

मिड डेच्या वृत्तानुसार, अभिनेत्री माधुरी दीक्षित ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात माधुरी चक्क भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता विद्या बालन व माधुरी दीक्षितला एकत्र पाहणं हे प्रेक्षकासाठी पर्वणी असणार आहे.

हेही वाचा – ‘बिग बॉस १७’ विजेता मुनव्वर फारुकी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर करतोय काम, फोटो झाले व्हायरल

दरम्यान, ‘भूल भलैया ३’ चित्रपटात विद्या बालनची जरी एन्ट्री होत असली तरी अक्षय कुमार पुन्हा दिसणार नाही, असं दिग्दर्शक अनीस यांनी स्पष्ट सांगितलं. तसेच या चित्रपटात कियारा अडवाणीच्या ऐवजी कार्तिकची एक्स गर्लफ्रेंड सारा अली खानला घेण्याचा विचार सुरू आहे. पण हे अजून निश्चित झालेलं नाही.