९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. सध्या ‘डान्स दीवाने’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती परीक्षकाची भूमिका निभावत असल्याचं पाहायला मिळत आहे. या शोचं सूत्रसंचालन भारती सिंह करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागात भारतीने माधुरी व मलायका अरोराच्या मुलाबद्दल एक खास आठवण सांगितली आहे.

भारतीने करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात खास कॅमिओ केला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माधुरीचा लेक अरिन आणि अरबाज-मलायका यांचा मुलगा अरहान चित्रपटाच्या सेटवर सहायक म्हणून काम करत होते. याबद्दलची खास आठवण भारतीने ‘डान्स दीवाने’मध्ये सांगितली.

हेही वाचा : आली समीप लग्नघटिका! ‘असं’ पार पडलं पूजा सावंतचं व्याही भोजन, अभिनेत्रीच्या सासरी कोण-कोण असतं?

भारती म्हणाली, “मी करण सरांबरोबर नुकताच एक चित्रपट केला. यामध्ये तुमचा (माधुरी) लेक करण सरांना असिस्ट करत होता. कट झाल्यावर त्याला खुर्च्या आणायला सांगितल्या. मी आणि हर्ष त्याच्यावर बसलो. तेवढ्यात ही दोन मुलं आम्हाला हातातल्या पंख्याने वारा घालू लागली. तेवढ्यात करण सर आले आणि म्हणाले, तुम्ही या दोघांना भेटलात का? हा माधुरी मॅडमचा मुलगा आहे आणि हा मलायकाचा. ते शब्द ऐकून मी लगेच त्याच्या हातातून पंखा काढून घेतला.”

हेही वाचा : मराठमोळी अभिनेत्री झळकणार इंग्रजी नाटकात; याआधी शाहरुख व आमिर खानबरोबर केलंय काम, कोण आहे ती?

भारती पुढे म्हणाली, “खरंतर ही सुपरस्टार्सची मुलं आहेत. त्यामुळे कोणत्याही मोठ्या पदावर ही मुलं काम करू शकली असती. पण, असं न करता त्यांनी सेटवर सगळी कामं केली. मला त्या क्षणाला दोघांचाही खूप जास्त अभिमान वाटत होता. मी थक्क झाले होते. तुम्ही खूप चांगले पालक आहात. मी सुद्धा त्यादिवशी खूप काही शिकले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांना अरिन नेने आणि रायन नेने अशी दोन मुलं आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’साठी अरिनने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. यामध्ये आलिया भट्ट व रणवीर सिंह यांच्या प्रमुख भूमिका होत्या.