९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. सध्या ती कलर्स टीव्हीवर ‘डान्स दीवाने’ कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावत आहे. माधुरीच्या जोडीने या कार्यक्रमात सुनील शेट्टी सुद्धा परीक्षकाची जबाबदारी निभावत आहे. या कार्यक्रमात प्रत्येक आठवड्याला खास पाहुणे येतात. करिश्मा कपूर, माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यानंतर आता ‘डान्स दीवाने’मध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने खास उपस्थिती लावली होती.

उर्मिला मातोंडकरने ‘रंगीला’, ‘जुदाई’, ‘सत्या’ अशा बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच तिने ‘डान्स दीवाने’मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी शोमध्ये २७ वर्षांपूर्वीच्या ‘जुदाई’ चित्रपटाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करण्यात आल्या.

हेही वाचा : Video : घुमा जोरात नाचतेय…! मुक्ता बर्वेचा न्यूयॉर्कमध्ये मराठमोळा अंदाज; साडी नेसून केला जबरदस्त डान्स

उर्मिला मातोंडकर, श्रीदेवी आणि अनिल कपूर यांचा २७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘जुदाई’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाची अनोखी कथा आजही सर्वांच्या लक्षात आहे. ‘डान्स दीवाने’च्या रंगमंचावर या गाजलेल्या चित्रपटातील सीन माधुरी, उर्मिला आणि सुनील शेट्टी यांनी मजेशीर अंदाजात रिक्रिएट केला. याचा खास व्हिडीओ कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : इंडस्ट्री सोडून अमेरिकेला जायचा निर्णय का घेतला? मृणाल दुसानिसने पहिल्यांदाच सांगितलं कारण; म्हणाली…

एवढंच नव्हे तर ‘जुदाई’मधील लोकप्रिय गाणं “प्यार प्यार करते करते… तुम पे मरते मरते… दिल दे दिया दिल दे दिया” या गाण्यावर माधुरी, उर्मिला आणि सुनील शेट्टी यांनी मिळून जबरदस्त डान्स केल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

“माधुरी आणि सुनील शेट्टी यांनी उर्मिला मातोंडकरच्या साथीने दिला जुन्या आठवणींना उजाळा” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. सध्या नेटकरी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षावर करत आहे. तर, अनेकांना हा डान्स पाहून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आठवल्या. आज २७ वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात ‘जुदाई’ चित्रपटाची क्रेझ कायम आहे. हा विशेष भाग येत्या शनिवार-रविवारी रात्री ९.३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

हेही वाचा : मालिकेतून काढून टाकलं, महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप; ‘त्यावेळी’ नेमकं काय घडलं? किरण मानेंनी स्पष्टच सांगितलं…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उर्मिला मातोंडकरला ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी म्हणून ओळखलं जातं. तिने ‘रंगीला’, ‘कौन’, ‘सत्या’, ‘भूत’, ‘कुंवरा’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.