पंकज त्रिपाठींचा बहुचर्चित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट येत्या १९ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनी केलं आहे. काही दिवसांपू्र्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. सध्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘मैं अटल हूं’ चित्रपटाचा ३ मिनिटं ३८ सेकंदाचा ट्रेलर प्रेक्षकांचं शेवटपर्यंत लक्ष वेधून घेतो. पंकज त्रिपाठींच्या अभिनयाचं सध्या सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. यामधील अनेक संवाद लक्षवेधी ठरतात. चित्रपटात लोकप्रिय मराठी अभिनेत्री गौरी सुखटणकरने भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भूमिका कोण साकारणार याबद्दल चर्चा रंगली होती. अखेर ‘मैं अटल हूं’चा ट्रेलर रिलीज झाल्यावर त्यांची भूमिका कोण साकारणार हे स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी! लवकरच झळकणार नव्या भूमिकेत, म्हणाली…

‘मैं अटल हूं’ चित्रपटात सोनिया गांधींची भूमिका अभिनेत्री पॉला मॅग्लिन साकारणार आहे. पॉला आणि मराठी सिनेसृष्टीचं खास कनेक्शन आहे. भाडिपा या मराठी सीरिज व कंटेट बनवणाऱ्या लोकप्रिय युट्यूब चॅनेलची ती संस्थापक आहे. वैयक्तिक आयुष्यात पॉला गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता सारंग साठ्येला डेट करत आहे. यापूर्वी तिने भाडिपाच्या अनेक मराठी सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु, पंकज त्रिपाठींसारख्या दिग्गज अभिनेत्याबरोबर ती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. अभिनेत्रीला मिळालेल्या या मोठ्या संधीबद्दल सध्या पॉलाचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : रितेश-जिनिलीयाच्या मुलांनी आजीबरोबर ‘असं’ साजरं केलं नववर्ष! देशमुखांच्या सुनेने शेअर केला खास फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट १९ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग मुंबई, दिल्ली, कानपूर आणि लखनऊसह वेगवेगळ्या ठिकाणी ४५ दिवसांत झालं आहे.