ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दिन शाह त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजच्या नव्या सीझनमुळे चर्चेत आहेत. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाबद्दलही उघडपणे भाष्य केलं आहे. हा चित्रपट पाहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच त्यांनी या चित्रपटाला धोकादायक ट्रेण्ड असल्याचेही म्हटलं होतं. नसीरुद्दिन यांच्या या विधानावरून भोजपूरी अभिनेता मनोज तिवारी संतापले आहेत. तिवारी यांनी नसीरुद्दिन शाह यांना चांगलंच सुनावलं आहे.

हेही वाचा- १६ डिग्री तापमानात शूटिंग अन् ४० तास पाणी न प्यायल्याने…; ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने सांगितली भयानक परिस्थिती

मनोज तिवारी यांना नसीरुद्दिन शाह यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “ते चांगले अभिनेते आहेत, पण त्यांचा हेतू चांगला नाही आणि मी खूप जड अंत:करणाने हे सांगत आहे. दुकानात बसलेला एक भटका माणूस येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांची छेड काढायचा, असे चित्रपटांमध्ये दाखवले जात होते. तेव्हा नसीरसाहेबांनी आवाज का उठवला नाही,” असा प्रश्नही मनोज तिवारी यांनी विचारला आहे.

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा आहे ‘या’ मराठी पदार्थाच्या प्रेमात, खुलासा करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिवारी पुढे म्हणाले,” ‘द केरला स्टोरी’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ हे सत्यकथेवर आधारित चित्रपट आहेत. ‘त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. कोणत्याही गोष्टीवर आपली प्रतिक्रिया देणे खूप सोपे आहे. ते ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यावरून त्यांनी भारतीय नागरिक आणि माणूस म्हणून चांगली ओळख निर्माण केलेली नाही,” असेही तिवारी म्हणाले.