10 Films Releasing Theatres in July 2025: माणसाच्या आयुष्यात मनोरंजनाला मोठे स्थान आहे. दैनंदीन कामातून विसावा मिळावा म्हणून विविध मनोरंजनाच्या साधनांकडे माणूस वळतो. यामध्ये चित्रपट, मालिका, नाटक, गाणी, नृत्य आणि आता वेब सीरीज अशा अनेक माध्यमांचा समावेश आहे.

अनेक चित्रपटांची बऱ्याचदा समाजावर छाप पडताना दिसते. कलाकारांचे कपडे, हेअरस्टाइलचे तरुणाईकडून अनुकरण केले जाते. काही संवाद, गाणी सहजपणे म्हटली जातात. त्यामुळे मनोरंजनामध्ये चित्रपटांचा वाटा मोठा आहे. अशा अनेक कारणांमुळे प्रेक्षक नवनवीन चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. आता जुलै महिन्यात १० चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत. या महिन्यात कोणते चित्रपट कधी प्रदर्शित होणार, हे जाणून घेऊ…

१. मेट्रो इन दिनों

अनुराग बासू दिग्दर्शित ‘लाइफ इन मेट्रो’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल ‘मेट्रो इन दिनों’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मेट्रो इन दिनों’ या चित्रपटात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, अली फझल, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, नीना गुप्ता, अनुपम खेर हे कलाकार दिसणार आहेत. चार लव्ह स्टोरी या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ४ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता लाइफ इन मेट्रो प्रमाणेच चित्रपटाला यश मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

२. मालिक

मालिक या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तो एका वेगळ्या रुपात या चित्रपटात दिसणार आहे. पुलकित यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात अॅक्शन सीन पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट ११ जुलैला प्रदर्शित होणार आहे. राजकुमार रावच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटालादेखील प्रेक्षकांचे प्रेम मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

३. आँखों की गुस्ताखियां

लोकप्रिय अभिनेता विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ११ जुलै २०२५ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक चित्रपट आहे. संतोष सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चाहते यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

४. सैयारा

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित सुरी यांचा ‘सैयारा’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ‘सैयारा’ चित्रपटात बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडेंचा पुतण्या व अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तो या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अनीत पड्डादेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

५. सन ऑफ सरदार २

सोनाक्षी सिन्हा आणि अजय देवगण यांची प्रमुख भूमिका असलेला सन ऑफ सरदार हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सन ऑफ सरदार २ मध्ये सोनाक्षी सिन्हा नाही तर अजय देवगणबरोबर अभिनेत्री मृणाल ठाकूर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. २५ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

६. परम सुंदरी

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला परम सुंदरी हा चित्रपटदेखील जुलै महिन्यातच प्रदर्शित होणार आहे. तुषार जलोटा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपटदेखील २५ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

७.तन्वी द ग्रेट

अनुपम खेर दिग्दर्शित तन्वी द ग्रेट हा चित्रपट १८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात ईएन ग्लेन, शुभांगी दत्त, अनुपम खेर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच, जुरासिक वर्ल्ड रीबर्थ(Jurassic World Rebirth) हा ४ जुलैला प्रदर्शित होणार आहे. सुपरमॅन(Superman) हा चित्रपट ११ जुलैला प्रदर्शित होणार आहे. द फन्टॅस्टिक फोर: फर्स्ट स्टेप्स( The Fantastic Four: First Steps) हा चित्रपट २५ जुलैला प्रदर्शित होणार आहे.