किंग खान म्हणून ओळख असलेला शाहरुख खान(Shah Rukh Khan) हा फक्त त्याच्या अभिनयासाठीच नाही तर त्याच्या उदार स्वभावासाठीदेखील ओळखला जातो. ज्या पद्धतीने तो इतर सहकलाकारांना मान- सन्मान देतो त्याची वेळोवेळी चर्चा होताना दिसते. शाहरुख खानने अनेकदा विविध मुलाखतींमध्ये महिलांना आदर देण्याविषयी वक्तव्य केले आहे. त्याच्याबरोबर काम केलेल्या अनेक कलाकार, दिग्दर्शक-निर्मात्यांनीदेखील अभिनेत्याच्या वागणुकीचे नेहमीच कौतुक केल्याचे पाहायला मिळते. आता मात्र लोकप्रिय गायक मिका सिंगने शाहरुख खानने दिलेले वचन पूर्ण केले नसल्याचे वक्तव्य केले आहे.

मिका सिंगने नुकत्याच पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत दशकापूर्वीच्या हृतिक रोशनच्या वाढदिवसाच्या पार्टीची आठवण सांगितली. त्याने म्हटले, “शाहरुखने नुकतीच रोल्स रॉयस ही गाडी घेतली होती आणि आम्ही सगळ्यांनी त्या गाडीतून फिरायला जावे असे त्याला वाटत होते. पण, मी आग्रह केला की अशा गाडीतून जाऊ, ज्यामध्ये सगळ्यांना बसण्यासाठी जागा मिळेल. सकाळचे पाच वाजले होते आणि मी माझ्याकडे असलेली हमर गाडी घेण्याचे सुचवले. रणवीर सिंग, गौरी, संजय कपूर, त्यांची पत्नी महदीप हेसुद्धा आमच्याबरोबर आले. पण, त्यानंतर गाडीत जागेची समस्या निर्माण झाली. कोण गाडी चालवणार हा प्रश्न पडला. जर ड्रायव्हरला नेले असते तर जागेची समस्या निर्माण झाली असती, त्यामुळे मी शाहरुखला गाडी चालवण्याची विनंती केली. तो इतका चांगला आहे, त्याने गाडी चालवण्याचे मान्य केले.

पुढे मिका सिंगने म्हटले की, त्या रात्री मी शाहरुख खान, रणवीर सिंग व हृतिक रोशन यांच्याबरोबर फोटो काढला. मी शाहरुखसाठी जास्त गाणी गायली नाहीत. मात्र, त्याने ज्याप्रकारे मला वागणूक दिली, त्यावरून मला वाटते की मोठ्या मनाचा आहे. मी त्याच्यासाठी ‘रईस’ व ‘हॅपी न्यू इअर’ या चित्रपटातील गाणी गायली आहेत. माझ्या घरातील पीएस ५ देखील त्याच्याकडून मिळालेली भेट आहे, असे म्हणत त्याने शाहरुख खानचे कौतुक केले.

पुढे मिकाने, शाहरुख खानने त्याला एकदा बाईक गिफ्ट म्हणून देण्याचे वचन दिले होते, मात्र त्याने ते पूर्ण केले नाही, अशी तक्रार करत म्हटले, “मला त्याच्याकडून भेटवस्तू मिळाल्या आहेत, पण त्याने एकदा मला बाईक भेट देण्याचे वचन दिले होते. त्याने अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांना बाईक भेट देताना ते वचन दिले होते. बाईक नसली तरी किमान मला सायकल भेट दिली तरी मला खूप आनंद होईल”, असे म्हणत कमीत कमी शाहरुखने त्याला सायकल गिफ्ट द्यावी, असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत गायकाने म्हटले, “मी ५० लाख किमतीच्या अंगठ्या अमिताभ बच्चन व गुरूदास मान यांना दिल्या आहेत. पण, सगळ्यात पहिल्यांदा मी शाहरुख खानला अंगठी दिली आहे. मला पहिल्यापासूनच या तीन व्यक्तींसाठी काहीतरी खास करायचे होते.”