अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण ६० वर्षांचे झाले आहेत. त्यांचा फिटनेस तरुणांनाही लाजवेल, असा आहे. मिलिंदच्या मते आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे ते शरीराला नुकसान पोहोचवणाऱ्या गोष्टींपासून पूर्णपणे दूर राहतात. व्यायाम, संतुलित आहार व साधेपणा हा मिलिंद सोमणचा फिटनेस मंत्र आहे.
मिलिंद सोमण यांनी अनेकदा आपल्या फिटनेस मंत्राबद्दल सांगितलं आहे. मिलिंद नाश्ता, चहा-कॉफी अजिबात घेत नाहीत. योगा करतात आणि ध्यान करतात. ते तेलकट पदार्थांचे सेवन करणं टाळतात.
रोज व्यायाम करतात मिलिंद सोमण
एका इंटरव्ह्यूमध्ये मिलिंद सोमण यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करत असल्याचं सांगितलं होतं. ते रोज १५ ते २० मिनिटं न चुकता व्यायाम करतात. पण त्यातून त्यांना दिवसभर ऊर्जा मिळते. कधी ते पावसात छतावर व्यायाम करतात, कधी ते डोंगरावर जाऊन व्यायाम करतात, तर कधी सायकलिंग करतात. मी व्यायामाचं ठराविक शेड्यूल पाळत नाही. वातावरण, जागा आणि मूडनुसार व्यायाम बदलतात, असं मिलिंद सोमण यांनी म्हटलं होतं. त्यांना रनिंग, ट्रेकिंग फार आवडतं. त्यांच्यासाठी धावणं म्हणजे फक्त एक्सरसाइज नसून एक प्रकारचे ध्यान आहे.
सायकलिंग करतात मिलिंद सोमण
एका व्हिडीओमध्ये त्यांनी रनिंग सॅण्डल घालून ८० किमी सायकल चालवली होती. ते रोजच्या कामांना देखील वर्कआउटमध्ये बदलतात. सायकलिंगमुळे पाय मजबूत होतात. पोटाचे स्नायूही मजबूत होतात. मिलिंद सोमणना पुल-अप्स खूप आवडतात. जंगलात झाडाच्या फांद्यांवर ते पुल-अप्स करतात. हे नैसर्गिक जिम असल्याचं ते म्हणतात.
मिलिंद सोमण रोज करत असलेले इतर व्यायाम
मिलिंद सोमण हँडस्टॅण्डही करतात. यामुळे कोअर स्ट्रेंथ आणि बॅलन्स सुधारतो. ते पुश-अप्स करतात. ते एका स्ट्रेचमध्ये ५० ते १०० पुश-अप्स करू शकतात. ते प्लँक करतात, यामुळे पोटाची चरबी दूर होते. योग आणि ध्यान हे त्यांच्या दिनचर्येचा महत्वाचा भाग आहे. त्यांचा दिवस प्राणायामने सुरू होतो. पोहणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, असं मिलिंद सोमण सांगतात.
मिलिंद सोमण यांचा आहार
मिलिंद सोमण यांचा आहार खूप साधा असतो. ते फळे, हिरव्या भाज्या, कडधान्ये आणि मांस खातात. पॅकेज्ड आणि जंक फूडपासून दूर राहतात. ते दररोज ७-८ ग्लास पाणी पितात. त्यांच्यामते, चांगली झोप खूप महत्वाची आहे. मिलिंद सोमण चहा आणि कॉफी घेणं टाळतात.
