गेल्या काही वर्षात अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. दक्षिणात्य चित्रपटांप्रमाणेच हिंदी चित्रपटातही आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडत त्यांनी संपूर्ण देशाला वेड लावलं. यामध्ये काहींना यश आलं तर काहींना अपयश आलं. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. बॉलिवूडमधील तिचा पहिला चित्रपट अपयशी ठरल्याने दुसऱ्या चित्रपटाच्या बाबतीत तिला मोठा फटका बसला आहे.

रश्मिकाने या वर्षाच्या सुरुवातीला ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ घातली. दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रियता मिळवल्यावर यावर्षी तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘गुडबाय’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. याचाच परिणाम म्हणून तिच्या पुढच्या बॉलिवूड चित्रपटाच्या बाबतीत त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : वादात सापडलेल्या ‘पठाण’ चित्रपटासाठी शाहरुख खानने आकारले ‘इतके’ कोटी, मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क

लवकरच रश्मिका ‘मिशन मजनू’ या बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर तिच्याबरोबर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याची तिच्या चाहत्यांमध्ये चर्चा होती. आधी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार होता. मात्र रश्मिका च्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद बघून आता यात बदल केला गेला आहे.

हेही वाचा : ‘पुष्पा २’ची प्रदर्शनाआधीच रेकॉर्डब्रेक कमाईला सुरुवात, ‘आरआरआर’ चित्रपटालाही टाकले मागे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मिशन मजनू’ हा रश्मिकाचा आगामी चित्रपट चित्रपटगृहात नाही तर थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘नेटफ्लिक्स’ची करार करून ‘मिशन मजनू’ हा चित्रपट ते ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित करणार आहेत. हा चित्रपट 20 जानेवारी रोजी ओटीटी वरून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.