कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांची नुकतंच घोषणा झाली. ऑस्कर २०२३मध्ये भारताने दोन पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग पुरस्कार मिळाला आहे. तर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीनेही ऑस्कर पटकावला आहे. नाटू नाटू गाण्याला पुरस्कार मिळाल्यानंतर आता विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांचे कौतुक करत आहे. नुकतंच खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी याबद्दल ट्वीट केले आहे.

९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर या गाण्याचा जलवाही पाहायला मिळाला. याचा एक व्हिडीओ अमोल कोल्हेंनी शेअर केला आहे.
आणखी वाचा : Oscar Awards 2023 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; भारताची ऐतिहासिक कामगिरी, दोन ऑस्कर पुरस्कार पटकावले

“हा क्षण देशासाठी अभिमानाचा आहे! मी स्वत: एका विशिष्ट भाषेतील सिनेसृष्टीत काम करत आहे. या निमित्ताने मला प्रादेशिक चित्रपटाचे यश साजरा करण्याचे आणखी एक कारण मिळाले. कारण हिंदी चित्रपटांच्या पलीकडे प्रादेशिक भारतीय चित्रपट कायमच लक्षवेधी असतात. RRR च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन, नाटू नाटू, ऑस्कर”, असे अमोल कोल्हेंनी या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटले आहे.

आणखी वाचा : Oscars Awards 2023 : दीपिका पदुकोणच्या मानेवरील टॅटूने वेधलं लक्ष, अर्थ आहे फारच खास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला आहे. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘RRR’ने इतिहास रचला आहे.