वीस वर्षांपूर्वी ३० जुलैला ‘मुझसे शादी करोगी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्त्वाचे म्हणजे, भारतातील आणि भारताबाहेरील कित्येक चित्रपटगृहाबाहेर मंडप सजवले होते. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाताना लग्नघरात गेल्याचा अनुभव आला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली होती. ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत.

सलमान खान, प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार या तिघांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या तिघांमध्ये प्रमाचे वर्तुळ तयार होते, अशा आशयाचे या चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटाच्या यशाचे श्रेय डेव्हिड धवन, साजिद नाडियाडवाला आणि रुमी जाफरी यांच्या एकत्रित मेहनतीला दिले जाते. या चित्रपटातील सगळ्याच पात्रांना लोकप्रियता मिळाली होती. आता ‘इंडियन एक्स्प्रेस’बरोबर साधलेल्या संवादात रुमी जाफरी यांनी चित्रपटातील दुग्गल साहब हे पात्र काल्पनिक नसून खऱ्या व्यक्तीच्या प्रेरणेतून साकारल्याचे म्हटले आहे. दुग्गल साहब ही भूमिका कादर खान यांनी साकारली होती.

दुग्गल साहब या पात्राविषयी सांगताना त्यांनी म्हटले की, हे पात्र चित्रपट निर्माते राहुल रवैल यांचे वडील एच. एस. रवैल यांचे खूप जवळचे मित्र रिडकूकाका यांच्यापासून प्रेरणा घेत साकारले होते. त्यांची उंची फक्त २.५ फूट आहे. एच. एस. रवैल यांच्या ‘मेरे मेहबूब’, ‘मेहबूब की मेहंदी’ अशा त्यांच्या अनेक चित्रपटांत भूमिका करताना ते तुम्हाला दिसतील. तर जेव्हा मी ‘अंजाम’ या चित्रपटाची कथा लिहित होतो, त्यावेळी राहुलने गप्पा मारताना सहजच रिडकू काकांच्या आरोग्याविषयी माझ्याकडे विषय काढला होता. ते जेव्हा झोपून उठतात, तेव्हा अचानक त्यांना दिसणे बंद होते. काही वेळा त्यांना ऐकू येणे बंद होते. हे ऐकल्यानंतर मला धक्का बसला होता, पण त्याचवेळी मला याची गंमतदेखील वाटली होती. त्याचवेळी मी राहुलला सांगितले होते की, मी कुठल्यातरी चित्रपटात असे पात्र तयार करेन. कोणी यावर विश्वास ठेवणार नाही, असे राहुल मला म्हणाला होता. मात्र, मला माहीत होते विनोदी विश्वात ते आठवणीत राहण्यासारखे पात्र निर्माण होणार आहे. काही वर्षांनंतर हे पात्र मी ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात आणले.

हेही वाचा: “आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व दिले जाते”, सई ताम्हणकरचे विधान; म्हणाली, “या गोष्टीकडे…”

याबरोबरच राजपाल यादव यांचे पात्र शेवटच्या क्षणी या चित्रपटात घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. साजिद नाडियाडवाला यांनी मला कोणतीही कल्पना न देता राजपाल यादव यांना फोन करून अक्षय आणि सलमान खानसोबत मी एक चित्रपट करणार आहे आणि त्यामध्ये तुझी भूमिका असणार आहे, याबाबत रुमीबरोबर बोलून घे, असे सांगितले. त्यानंतर राजपाल यादवचा मला फोन आला, पण मी काहीच बोलू शकलो नाही. त्यानंतर मी साजिदला फोन करून राजपालसाठी कोणती भूमिका आहे, असे विचारल्यावर साजिद म्हणाला की, मला राजपाल यादव चित्रपटात पाहिजे, तो चांगला अभिनेता आहे, तू विचार कर त्याची भूमिका काय असेल. त्यावेळी माझ्यासाठी ती अत्यंत आव्हानात्नक गोष्ट होती. त्यानंतर मी विचार केला आणि रामपाल यादवला डबल रोल दिला. ब्रोकर आणि एका गँगचा लीडर अशी त्याची दुहेरी भूमिका या चित्रपटात होती. अशाप्रकारे चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्याआधी शेवटच्या क्षणी राजपाल यादव यांची सिनेमात एंट्री झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘मुझसे शादी करोगी’ हा चित्रपट २००४ मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला होता. अभिनेत्री प्रियांका चोप्राने चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.