Nana Patekar Manisha Koirala : अभिनेत्री मनीषा कोईराला व नाना पाटेकर यांच्या अफेअरची एकेकाळी जोरदार चर्चा होती. मनीषा व नाना यांनी ‘अग्नीसाक्षी’, ‘युग पुरुष’, ‘खामोशी’ या चित्रपटांमध्ये एकत्र केलं होतं. १९९६ मध्ये ‘अग्नी साक्षी’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मनीषाचं विवेक मुशरनशी ब्रेकअप झालं होतं आणि ती नाना पाटेकरांच्या प्रेमात पडली होती. त्यावेळी नाना विवाहित होते, पण ते पत्नी नीलकांतीपासून वेगळे राहत होते.
मनीषा कोईराला नाना पाटेकरांबद्दल बोलणं टाळते. पण एकदा मनीषा कोईरालाबद्दल नाना पाटेकरांना विचारण्यात आलं होतं. तेव्हा नाना यांनी उत्तर दिलं होतं. नाना पाटेकर व मनीषाचं ब्रेकअप अभिनेत्री आयशा जुल्कामुळे झालं असं म्हटलं जातं. नाना पाटेकरांनी ‘द लल्लनटॉप’ ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नाना यांना एक्स गर्लफ्रेंड मनीषा कोईरालाबद्दल विचारण्यात आलं होतं, तेव्हा ते काय म्हणाले होते? पाहुयात.
मनीषा कोईरालाबद्दल नाना पाटेकर काय म्हणाले होते?
नाना पाटेकरांना मुलाखतीत १० व्यक्तींबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. स्मिता पाटील, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान अशा दिग्गजांची नावं यात होती. यापैकीच एक नाव मनीषा कोईरालाचं होतं. तिचं नाव घेताच नाना काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. नाना यांनी मनीषाचं नाव ऐकून यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत होती.
हीरामंडीतील कामाचं केलेलं कौतुक
“महान अभिनेत्री. तिला खूप कमी वयात कर्करोग झाला. तू ‘हीरामंडी’ पाहिलीस का? त्यात तिने खूप छान काम केलं आहे. मी तिची सीरिज पाहिली,” असं नाना पाटेकर म्हणाले होते. मनीषा कोईरालाने २०२४ मध्ये आलेल्या ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. तिच्या या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं होतं.
‘हीरामंडी’ पाहिल्यावर मनीषा कोईराला यांना शुभेच्छा दिल्या का? असं मुलाखतकाराने नाना पाटेकरांना विचारलं. त्यावर “नाही. कदाचित तिचा फोन नंबर आता तो नाही, बदलला आहे,” असं नाना म्हणाले होते.
स्मिता पाटील यांच्या निधनाबद्दल नाना पाटेकर म्हणालेले…
नाना पाटेकर यांनी स्मिता पाटील यांची भावनिक आठवण सांगितली होती. नाना व मनीषा यांची खूप चांगली मैत्री होती. स्मिता पाटील यांच्या निधनाबद्दल कळलं तेव्हा तुम्ही कुठे होता? असं नाना यांना विचारलं होतं. “बाबा आमटेंसाठी एक शो सुरू होता, मी तिथेच होतो. मला तिच्यामुळेच गाडी शिकता आली. ती मला साडी घ्यायला सोबत न्यायची, कोणती साडी घ्यायचीय ते विचारायची. ती खूपच वेगळी होती, खूप कमाल होती, ती खूप लवकर गेली. तिच्यासारखे लोक खूप कमी असतात. ती असती तर आताही इंडस्ट्रीत त्याच शिखरावर असती,” असं नाना पाटेकर स्मिता पाटीलबद्दल म्हणाले होते.