अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन सध्या ‘पॅरिस फॅशन वीक २०२४’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमात ऐश्वर्या जबरदस्त रॅम्प वॉक करताना दिसली. तिला पाठिंबा देण्यासाठी तिची लाडकी लेक आराध्या होती. बच्चन कुटुंबातील कोणताही सदस्य ऐश्वर्याबरोबर नव्हता. या कार्यक्रमात दुसऱ्या बाजूला अभिनेत्री आलिया भट्टने देखील आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला. यावेळी आलिया भट्टला पाठिंबा देण्यासाठी रणबीर कपूर, नीतू सिंह उपस्थित होत्या. नीतू सिंह यांनी आलियाचे रॅम्प वॉक करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडीओमध्ये सासू सूनेला प्रोत्साहन देताना दिसली. आलियाने या कार्यक्रमाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये रॅम्प वॉक करतानाचे फोटो आणि व्हिडीओ आलियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टवर अनेक बॉलीवूड कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याप्रमाणे ऐश्वर्याची भाची नव्या नवेली नंदाने देखील आलियाचं कौतुक करण्यासाठी इमोजी शेअर केले आहेत. हेच पाहून ऐश्वर्याचे चाहते भडकले आहेत. ऐश्वर्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नव्याला सध्या ट्रोल केलं जात आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18 : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीने सलमान खानच्या लोकप्रिय शोची ऑफर नाकारली, म्हणाली…

नव्या नवेली नंदाच्या प्रतिक्रियेवर ऐश्वर्याच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. “आधी ऐश्वर्याला जाऊन पाठिंबा दे”, ‘ऐश्वर्या क्वीन आहे”, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “थोडं आपल्या मामीला पाठिंबा दे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “काकीला पाठिंबा दिला आता मामीला पण पाठिंबा दे.” अशाप्रकारच्या प्रतिक्रिया ऐश्वर्या चाहत्यांनी देत नव्याला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा – Video: फुग्यांनी सजलेली गाडी, फुलांचा वर्षाव अन्…, मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावाचं ‘असं’ झालं स्वागत, पाहा व्हिडीओ

Navya Naveli Nanda Comment
Navya Naveli Nanda Comment

दरम्यान, ऐश्वर्या राय-बच्चनच्या ( Aishwarya Rai Bachchan ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची ‘पोन्नियिन सेलवन: २’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने दुहेरी भूमिका साकारली आहे. नंदिनी आणि मंदाकिनी देवी या दोन भूमिकेत ऐश्वर्या झळकली आहे. एका तामिळ कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या व्यतिरिक्त कार्ती, जयम रवी, त्रिशा, जयराम, प्रभू, आर सरथकुमार, शोभिता धुलिपाला, ऐश्वर्या लक्ष्मी, विक्रम प्रभू, प्रका राज, रहमान आणि आर पार्थिवन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसंच आलियाच्या भट्टच्या कामाबद्दल बोलायचं तर, तिचा ‘जिगरा’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आलियाबरोबर अभिनेता वेदांग रैना झळकणार आहे. बहीण-भावाच्या नात्यावर आधारित असलेला ‘जिगरा’ चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.