‘सेक्रेड गेम्स’ फेम नवाजुद्दिन सिद्दिकीने बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवाजुद्दिन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘जोगीरा सारा रा रा’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनासाठी नवाजुद्दीनने शहनाझ गिलच्या ‘देसी वाइब्स विथ शहनाझ’ या शोमध्ये हजेरी लावली होती.

हेही वाचा : ब्रेकअपच्या अफवा ऐकून करण कुंद्रा संतापला, म्हणाला, “तेजस्वी आणि माझ्यात…”

शहनाझ गिलच्या शोमध्ये नवाजुद्दीनने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. प्रेमाविषयी बोलताना त्याने सांगितले, “मी सगळ्या गोष्टींमध्ये फसवणूक करु शकतो मी खोटं सुद्धा बोलतो, परंतु प्रेमाच्या बाबतीत मी खूप जास्त खरा आहे. जोडीदाराच्या डोळ्यात बघून आपल्याला प्रेम झाले पाहिजे.”

बॉलीवूडमधील करिअरबाबत सांगताना नवाजुद्दीन म्हणाला, “आयुष्यात पुढे जाण्यासाठी जुगाड नाही तर आपल्याला मेहनत करणे गरजेचे असते. माणसाने अभिनय केल्यासारखे जीवन जगावे, या क्षेत्रात केवळ वेडे लोक येतात, सत्यजीर रे असे एकमेव होते ज्यांच्या घरी येवून लोकांनी त्यांना ऑस्कर दिला होता.”

हेही वाचा : ‘चंद्रमुखी’ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार; आई-वडिलांचा फोटो शेअर करीत अमृता म्हणाली, “माझ्या पालकांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हा नवाजुद्दीनने शहनाझला तिला पुढे काय करायचे आहे याबाबत विचारले तेव्हा ती म्हणाली, “मला अभिनय, फॅशन आणि गाण्याची आवड आहे.” दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘अफवाह’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला असून यामध्ये त्याच्यासोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. लवकरच नवाजुद्दीन हा नेहा शर्मासोबत ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटात दिसणार आहे.