विविधांगी भूमिका साकारुन अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. नवाजुद्दीन बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘मांझी’, ‘बजरंगी भाईजान’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ यांसारख्या चित्रपटातून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला.हिंदीप्रमाणेच नवाजुद्दीनने ‘ठाकरे’ या मराठी चित्रपटातही काम केलं आहे. या चित्रपटात त्याने बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारली होती.

आता पुन्हा नवाजुद्दीन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूडमध्ये नाव कमावलेला नवाजुद्दीन मराठीचा चाहता आहे. नवाजुद्दीनने नुकतंच मराठीत ट्वीट केलं आहे. २७ फेब्रुवारीला साजरा करण्यात येणाऱ्या मराठी राजभाषा दिनानिमित्त नवाजुद्दीनने हे ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने “मराठी भाषा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली आहे! मराठी नाटक, मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राच्या लोककला यांचा मी चाहता आहेच! सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा !! लवकरच अभिजीत पानसे यांच्याबरोबर काहीतरी इंटरेस्टिंग येणार आहे”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा>> Selfiee Box Office: अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ ठरला फ्लॉप; १५० कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी

हेही वाचा>> Video: “८० हजारांचे शूज” व्हिडीओतील ‘त्या’ कृतीमुळे एमसी स्टॅन ट्रोल, नेटकरी म्हणाले “छपरी…”

नवाजुद्दीनने केलेलं हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. या ट्वीटमधून त्याने आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. नवाजुद्दीन दिग्दर्शक अभिजीत पानसेंबरोबर काम करणार असल्याचं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या ट्वीटमुळे त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

हेही वाचा>> नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, पोलिसांत केली तक्रार दाखल, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नवाजुद्दीने गेल्या काही दिवसांपासून वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याच्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. याबरोबरच बलात्कार केल्याचा आरोपही नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याच्यावर केला असून यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती तिने दिली आहे.