Rani Mukerji’s necklace: अभिनेत्री राणी मुखर्जीने १९९७ साली ‘राजा की आएगी बारात’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘मेहंदी’, ‘कहीं प्यार ना हो जाए’, ‘प्यार दिवाणा होता है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हे राम’, ‘बादल’, ‘मर्दानी’, अशा अनेक चित्रपटांतून अभिनेत्रीने प्रेक्षकांची मने जिंकली.

बॉलीवूडमधील लोकप्रिय अभनेत्री म्हणून राणी मुखर्जीची ओळख निर्माण झाली. . नुकताच अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.

‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिला गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात राणी मुखर्जीसह शाहरुख खान, विक्रांत मेस्सी या कलाकारांनादेखील गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राणी मुखर्जीने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात घातलेल्या नेकलेसची का होतेय चर्चा?

एका व्हिडीओमध्ये शाहरुख खान मेडल घालण्यासाठी उत्सुक दिसत आहे. राणी त्याला ते मेडल घालण्यासाठी मदत करत असल्याचे पाहायला मिळाले. आता या सगळ्यात राणीच्या पारंपरिक लूकनेदेखील लक्ष वेधले, तसेच गळ्यातील नेकलेसने लक्ष वेधले आहे.

राणीने या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावताना एक नेकलेस घातला होता. यामध्ये तिच्या मुलीचे नाव दिसत आहे. अधिरा या नावाची अक्षरे या नेकलेसवर दिसत आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर या नेकलेसची चर्चा रंगताना दिसत आहे. २०१४ मध्ये राणीने आदित्य चोप्राबरोबर लग्नगाठ बांधली. २०१५ मध्ये त्यांना मुलगी झाली, तिचे नाव अधिरा असे आहे.

फोटो सौजन्य: इ्न्स्टाग्राम

विधू विनोद चोप्रा यांच्या ‘१२वी फेल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला, तर करण जोहर आणि अपूर्व मेहरा यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’साठी सर्वोत्तम लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार स्वीकारला. ‘द केरल स्टोरी’साठी सुदिप्तो सेन यांचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरव करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मंगळवारी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

दरम्यान, मराठी चित्रपट‘आत्मपॅम्फ्लेट’साठी आशिष बेंडे यांना पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला. ‘नाळ २’मधील त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना उत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.