बॉलीवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्करने आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या मनात एक अटळ स्थान निर्माण केलं आहे. तिची आतापर्यंत आलेली सर्व गाणी हिट ठरली आहेत. नेहाचा पती रोहनप्रीत सिंग देखील तिच्याप्रमाणे खूप सुंदर गातो. तो एक पंजाबी गायक आहे. नेहाबरोबर लग्न झाल्यापासून रोहनप्रीत नेहमी चर्चेत असतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल सातत्याने होतं असतात. नुकताच रोहनप्रीत सिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो मराठी गाणं गाताना पाहायला मिळतं आहे.

गायक रोहनप्रीत सिंगने काही तासांपूर्वी इन्स्टाग्राम एक व्हिडीओ शेअर केला आहे. “या गोड रीलसाठी धन्यवाद. शिवाय सगळ्यांचा मी आभारी आहे,” असं लिहित रोहनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहन ‘ढगाला लागली कळ’ हे गाणं गाताना दिसत आहे. त्याच्या आवाजात हे गाणं ऐकून उपस्थित श्रोते नाचताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – सावनीच्या तमाशानंतर मुक्ता भर मंडपात सागरबरोबर मोडणार लग्न; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मोठा ट्विस्ट

रोहनप्रती सिंगच्या या व्हिडीओवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याची पत्नी नेहा कक्करने व्हिडीओवर प्रतिक्रिया देत लिहिलं आहे, “मी स्वतः या क्षणाची साक्षीदार आहे. तुझी पत्नी असल्याचा मला खूप अभिमान आहे.” तर नेहाचा भाऊ टोनी कक्करने लिहिलं आहे, “आताचा स्टार मराठी मुलगा.” तसेच इतरांनी रोहनप्रीतच्या मराठीचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “तुमचं मराठी खूप सेक्सी आहे.”

हेही वाचा – छगन भुजबळांच्या पहिल्या सिनेमातून सविता मालपेकरांना काढलं होतं, किस्सा सांगत म्हणाल्या, “रंजना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रोहनचा हा व्हिडीओ नुकत्याच झालेल्या बदलापूर कॉन्सर्टमधला आहे. या कॉन्सर्टला त्याची पत्नी नेहा कक्करने देखील हजेरी लावली होती. शिवाय सोनू निगम सुद्धा या कॉन्सर्टला हजर होता.