सध्या फिफा विश्वचषक २०२२ची सगळीकडेच चर्चा आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी फिफा सोहळ्याला हजेरी लावली होती. आता बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा फिफा वर्ल्ड कपमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. नोराने फिफा वर्ल्ड कपमध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकवल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

‘गरमी’, ‘ओ साकी साकी’  गाण्यांमधून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या नोराने फिफा वर्ल्ड कपच्या फॅनफेस्ट इव्हेंटमध्येही डान्सने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नोराने तिच्या तालावर चाहत्यांनाही ठेका धरायला भाग पाडलं. डान्स सादर केल्यानंतर नोराने मंचावर भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावला. यावेळी तिने ‘जय हिंद’ अशा घोषणाही दिल्या. नोराचा फिफा वर्ल्ड कपमधील हा व्हिडीओ एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> “निधड्या छातीवरती हे, शिवतेज तळपते” मराठीमध्ये नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा, ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत

हेही वाचा>> ४९व्या वर्षी मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“फिफा वर्ल्ड कपमध्ये भारताचा सहभाग नाही. परंतु, आपली गाणी व डान्सद्वारे आपण इथे उपस्थित आहोत”, असं तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे.