Nutan slapped Sanjeev Kumar in public: कलाकार जितके त्यांच्या चित्रपट, भूमिकांमुळे चर्चेत असतात, तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते संजीव कुमार यांना खात्री होती की ते कधीच लग्न करणार नाहीत. याचे कारण म्हणजे त्यांना हृदयविकार होता, यामुळे त्यांच्या जोडीदारावर अन्याय होईल, असे त्यांना वाटत असे.

राजेश खन्ना यांना मद्यपान करणे आवडत असे. दररोज रात्री ते त्यांच्या मित्रांबरोबर मद्यपान करत असत. संजीव कुमार यांचे आत्मचरित्र लिहिणारे हनिफ झवेरी आणि संजीव कुमार यांची भाची जिग्ना यांच्या मतानुसार हरिभाईंना (संजीव कुमार) त्यांच्या जीवनशैलीचा भार त्यांच्या जोडीदारावर टाकायचा नव्हता, म्हणून त्यांना लग्न करायचे नव्हते. पण, ते त्यांचा हा नियम मोडणार होते. ते त्यांच्या आयुष्यात दोन वेळा प्रेमात पडले. एकदा हेमा मालिनी आणि दुसऱ्यांदा नूतन यांच्या ते प्रेमात पडले.

“नूतन यांनी सर्वांसमोर…”

विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत हनिफ झवेरी व जिग्ना यांनी संजीव कुमार यांची एक आठवण सांगितली. नूतन यांनी सार्वजनिक ठिकाणी संजीव कुमार यांच्या कानाखाली दिली होती, असा खुलासा त्यांनी केला. जेव्हा संजीव कुमार व नूतन हे एकमेकांच्या प्रेमात पडले, तेव्हा नूतन यांचे आधीच रजनीश बहल यांच्याशी लग्न झाले होते.

हनिफ झवेरी म्हणाले, “देवी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक मधुसुधन राव यांची महत्त्वाची भूमिका होती. पण, हे नाते फार काळ टिकले नाही. संजीव कुमार व नूतन यांचे नाते तुटण्याआधी एक घटना घडली. नूतन यांनी सर्वांसमोर संजीव कुमार यांना कानाखाली मारली होती. ती घटना घडण्याअगोदर संजीव कुमार यांना कळले की नूतन व त्यांच्या पतीचे घरी भांडण होत आहे.”

“त्यांनी त्यांच्या घरी फोन करून रजनीश बहल यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, संजीव कुमार यांच्या फोन करण्याने प्रकरण बिघडले. नूतन यांच्या पतीला आणखी राग आला. दुसऱ्या दिवशी संजीव कुमार यांच्याशी प्रेमसंबंध नसल्याचे तिच्या पतीसमोर सिद्ध करण्यासाठी नूतन सेटवर आल्या आणि सर्वांसमोर संजीव कुमार यांना कानाखाली मारली. दोन्ही कलाकारांमध्ये वाद झाल्याने शूटिंग थांबले.

संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांच्यातही प्रेमसंबंध होते. त्यांचे नाते संपुष्टात येण्याचे कारण म्हणजे हेमा मालिनीने अभिनय सोडून गृहिणी व्हावे अशी त्यांची इच्छा होती. हेमा मालिनी यांच्याशी नाते तुटण्याचा संजीव कुमार यांना खूप त्रास झाला. संजीव कुमार यांना इतका त्रास झाला की पुढे त्यांनी अभिनेत्रीबरोबर चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला. धर्मेंद्र यांनीही संजीव कुमार यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली नाही. १९९१ मध्ये ५४ व्या वर्षी नूतन यांचे निधन झाले.