अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगणने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वीच चर्चेत राहायला सुरुवात केली आहे. न्यासा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अनेकदा ती विविध पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असते. तिच्या वागण्यामुळे ती नेहमी लक्ष वेधून घेत असते. आता तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
न्यासा बऱ्याचदा विविध कारणांमुळे बाहेरगावी जाताना दिसते. नुकतीच ती विमानातून मुंबईबाहेर रवाना झाली. यावेळचा तिचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आली आहे. बाहेर जाताना तिने हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि जीन्स परिधान केली होती. तर ती खूप घाईत दिसली. पण तिचा हा अॅटिट्यूड नेटकऱ्यांना फारसा आवडला नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा तिच्यावर निशाणा साधला.
हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एकाने लिहीलं, “जगातलं सर्वात चांगलं काम काय आहे? आई-बाबा तुला खर्च करता यावेत म्हणून उत्तम पैसे कमवतात आणि तुला फक्त आराम करत, चांगलं चांगलं खात आयुष्य घालवायचं आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “ताई नेहमीच घाईत असतात.” तर आणखी एकाने लिहिलं, “अभ्यास करून शिकण्याच्या ऐवजी ही सारखी कुठे फिरत असते?” तर आणखी एकाने लिहिलं, “हिला काही कामं नाहीत का सारखी फिरत असते! काय काम करते की इतकी गंभीर असते! हिच्यापेक्षा हिची आई जास्त हसते…”
आता तिचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. पण तिच्या या अॅटिट्यूडमुळे तिला पुन्हा एकदा ट्रोलिंगला समोरं जावं लागत आहे.