scorecardresearch

Premium

‘OMG 2’चं अनकट व्हर्जन ‘या’ ठिकाणी प्रेक्षकांना पाहता येणार, दिग्दर्शकाचा मोठा निर्णय, म्हणाला…

सेन्सर बोर्डाने या चित्रपटाला ए प्रमाणपत्र देत या चित्रपटामधील २० दृश्यांवर कात्री लावली. पण या चित्रपटाचं अनकट व्हर्जन प्रेक्षकांसमोर येणार आहे.

omg 2

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून लैंगिक शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आलं आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने भगवान शंकराच्या दूताची भूमिका साकारली आहे. चित्रपटावरून बराच वादही झाला. पण आता या चित्रपटाच्या ओटीटी व्हर्जनबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. परंतु या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला. सेन्सर बोर्डाने देखील या चित्रपटाला ए प्रमाणपत्र देत या चित्रपटामधील २० दृश्यांवर कात्री लावली. पण या चित्रपटाचं अनकट व्हर्जन प्रेक्षकांसमोर येणार आहे.

the vaccine war
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ला सर्वत्र थंड प्रतिसाद, प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यासाठी निर्मात्यांनी दिली ‘ही’ लहास ऑफर
Gautami-Patil
लावणीने प्रेक्षकांना घायाळ करणारी गौतमी पाटील चित्रपटांमध्ये काम करणार का? उत्तर देत म्हणाली…
oppenheimer-ott-release
नेटफ्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम; कधी व कशावर पाहता येणार ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपनहायमर’?
Jawan Movie
भारतीय सेनेच्या जवानांसाठी ‘जवान’ चित्रपटाचे स्पशेल स्क्रीनिंगचे आयोजन, दिग्दर्शक एटलीही हजर

आणखी वाचा : Video: वयाच्या ५५व्या वर्षी अक्षय कुमारने केलं तांडव नृत्य, खिलाडी कुमारची एनर्जी पाहून नेटकरी थक्क

या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित राय एका मुलाखती दरम्यान म्हणाले, “हा चित्रपट सर्वांनी पहावा अशी आमची इच्छा होती. परंतु सेन्सॉर बोर्डाने ए सर्टिफिकेट दिल्याने आमची ही इच्छा अपुरी राहिली. या निर्णयामुळे आम्हाला खूप दुःख झालं. आम्ही त्यांना युएस सर्टिफिकेट देण्याची विनंती केली होती परंतु त्यांनी आमची मागणी मान्य केली नाही. पण या चित्रपटाचे अनकट व्हर्जन आम्ही ओटीटीवर प्रदर्शित करणार आहोत असं आम्ही ठरवलं आहे.”

हेही वाचा : काय सांगता! ‘OMG 2’साठी अक्षय कुमारने घेतलं नाही एक रुपयाचंही मानधन, निर्मात्यांनी उघड केलं कारण…

दरम्यान, हा चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याची तारीख अजून समोर आलेली नाही. या चित्रपटात अक्षय कुमार बरोबरच अभिनेते पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटगृहातही चांगली कामगिरी करत असून या चित्रपटाने दहा दिवसात शंभरहून अधिक कोटी कमाई केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Omg 2 director amit rai will be releaseimg uncut version of the film on ott rnv

First published on: 24-08-2023 at 14:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×