सध्या बरेच बॉलिवूड सेलिब्रिटीज लग्न करताना किंवा एकमेकांबरोबर रिलेशनशीपमध्ये दिसत आहेत. विकी-कतरिना पाठोपाठ नुकतंच कियारा-सिद्धार्थचं लग्न अगदी थाटात पार पडलं. आता रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भग्नानी यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. नुकतंच स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी लग्नगाठ बांधली. आता पाठोपाठ बॉलिवूडची बबली गर्ल परिणीती चोप्रासुद्धा अशाच काहीशा कारणांमुळे चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेता तसेच पंजाब राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा या दोघांना नुकतंच एकाच ठिकाणी पाहिलं गेलं. एका रेस्टोरंटबाहेर हे दोघे एकत्र दिसल्याने याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. शिवाय हे दोघेही पांढऱ्या रंगाचे सारखेच कपडे परिधान करून असल्याने या चर्चेला आणखी उधाण आलं.

आणखी वाचा : ‘भोला’मधील सहा मिनिटांच्या ‘त्या’ ॲक्शन सीनमागे आहे तीन महिन्यांची मेहनत; अजय देवगणने शेअर केला खास व्हिडीओ

यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा या दोघांना ‘भारत यूके आउटस्टैंडिंग अचीवर ऑनर्स’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. प्रथमच भारतीयांना हा पुरस्कार देण्यात आला होता. अजूनतरी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं नक्की झालं नसलं तरी त्यांचे हे नवे फोटो पाहून चर्चा सुरू झाल्या आहेत. व्हायरल झालेले फोटो पाहून नेटकऱ्यांनी परिणीतीला डेट करत आहेस का? असे प्रश्नदेखील विचारले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणीती १५ वर्षांपूर्वी ब्रिटनच्या ‘मँचेस्टर स्कूल’मधून तिचं शिक्षण पूर्ण केलं तर राघव चड्ढा यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनिमिक्स’मधून शिक्षण घेतलं आहे. परिणीती चोप्राचं नाव मध्यंतरी अर्जुन कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्राबरोबर जोडलं गेलं होतं, पण सध्या परिणीती सिंगल आहे आणि ३४ वर्षांच्या राघव यांनीही अद्याप लग्न केलेलं नाही. त्यामुळे त्यांचं हे अचानक मीडिया समोर कॅमेरामध्ये कैद होण्याने बऱ्याच गोष्टींच्या चर्चेला वाव मिळाला आहे. अर्थात याबद्दल अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.