बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आम आदमी पार्टी’चे खासदार राघव चड्ढा यांनी १३ मे रोजी दिल्लीच्या कपूरथळा हाऊसमध्ये साखरपुडा केला. गेल्या अनेक दिवसांपासून परिणीती-राघव यांचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होते. या दोघांच्या साखरपुडा समारंभाला बॉलीवूड कलाकारांसह राजकीय नेत्यांनी सुद्धा हजेरी लावली होती. दोघांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता साखरपुडा झाल्यावर तीन दिवसांनी परिणीती दिल्ली सोडून मुंबईला रवाना झाली आहे. तिने केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

परिणीतीने दिल्ली एअरपोर्ट परिसरातील फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट करीत त्यावर राघव चड्ढा यांच्यासाठी खास मजकूर लिहिला आहे. या फोटोवर परिणीती लिहिते, “बाय बाय ‘दिल्ली’…मी तुझा निरोप घेत असले तरीही, मी माझे ‘प्रेम’ इथे ठेवून जात आहे.” परिणीतीने राघव चड्ढा यांना उद्देशून ही स्टोरी शेअर केली आहे. शनिवारी साखरपुडा झाल्यावर तीन दिवसांनी परिणीती मुंबईला येत आहे.

हेही वाचा : ‘तारीख पे तारीख…’ सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ला प्रदर्शनाचा मुहूर्त सापडेना, जाणून घ्या कारण

हेही वाचा : ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगांनी सांगितला ‘तो’ अनुभव, खंत व्यक्त करीत म्हणाल्या “सर्वांना ट्रॉफीबरोबर…”

साखरपुडा केल्यावर आता परिणीती आणि राघव लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. याबाबत खुद्द परिणीतीने खुलासा केला आहे. परिणीतीची चुलत बहीण आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने परिणीती आणि राघवचे अभिनंदन करण्यासाठी तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यावर ‘मिमी दीदी, लवकरच तुला नवरी मुलीला सगळी मदत करायची आहे, अशी कमेंट परिणीतीने केली आहे.

हेही वाचा : सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील ‘तो’ प्रसंग रणबीर कपूरने केला रिक्रिएट, म्हणाला, “ते दोघे एकत्र…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, परिणीती शेवटची अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्यासोबत सूरज बडजात्याच्या ‘उंचाई’ चित्रपटात दिसली होती. लवकरच इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’मध्ये परिणीती ही दिलजीत दोसांझबरोबर काम करणार आहे.