शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट यंदाचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन २६ दिवस झाले आहेत आणि प्रेक्षक अजूनही हा चित्रपट पाहायला थिएटर्समध्ये जात आहेत. चित्रपटाने कमाईचे अनेक नवनवे विक्रम रचले आहेत, अशातच हा चित्रपट जगभरात १००० कोटी रुपये कमवण्यात यशस्वी ठरला आहे.

रवीना टंडनने अक्षय कुमारशी मोडलेल्या साखरपुड्याबद्दल तब्बल २२ वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “त्याच्या आयुष्यातून…”

‘पठाण’ने जगभरात तब्बल १००० कोटी रुपयांची कमाई केली आहे. नवीन रिलीज झालेले चित्रपट ‘शेहजादा’ आणि मार्वलचा ‘अँट मॅन अँड द वास्प: क्वांटुमेनिया’ प्रदर्शित होत असूनही, चित्रपटाच्या कमाईची गती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. बॉक्स ऑफिसवर २६ व्या दिवशी ‘पठाण’च्या स्क्रीन काउंट आणि कलेक्शनमध्ये वाढ पाहिली गेली.

Video: आधी तक्रार दिली अन् आता तुरुंगात राखी सावंतने घेतली पतीची भेट; म्हणाली, “आदिल माझ्याशी खूप…”

१९ फेब्रुवारी रोजी चित्रपटाने जगभरात १००० कोटींचा टप्पा ओलांडला आणि इतिहास रचला. गेल्या आठवड्यात या चित्रपटाने भारतात ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. अंदाजानुसार ‘पठाण’ने रविवारी बॉक्स ऑफिसवर ४.३० ते ४.५० कोटी रुपयांची कमाई केली. प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीमुळे ‘पठाण’च्या स्क्रीनची संख्या वाढली आहे. यामुळे देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन ५१५ कोटी रुपये झाले आहे.

Photos: मुंबईत पार पडला केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीचा रिसेप्शन सोहळा; शाहरुख खान, मौन रॉयसह दिग्गजांची हजेरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने तब्बल चार वर्षानंतर मुख्य अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. या चित्रपटात त्याच्याबरोबर दिपीका पदुकोण व जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत.