बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान विविध कारणांनी चर्चेत येत असतो. सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची हवा आहे. त्याचा हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तर ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच शाहरुख खानने आज ट्विटरवर “आस्क एसआरके” सेशन ठेवलं होतं.

“आस्क एसआरके” सेशनमध्ये शाहरुख खानने चाहत्यांना त्याला प्रश्न विचारण्यास सांगितलं होतं. चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची शाहरुख खानने उत्तरं दिली. त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले होते. ज्यात एकाने विचारले की, “लोक असं म्हणत आहेत की आम्ही ‘पठाण’ चित्रपट पाहण्यामागे नेमका उद्देश काय?” शाहरुख खानने यावर उत्तर दिले, “अरे देवा ही माणसं खरच खूप खोल आहे. आयुष्याचा उद्देश काय? कशाचे प्रयोजन काय? माफ करा मी इतका खोल विचार करणारा नाही.” असे त्याने उत्तर दिले.

“तू आता रिटायरमेंट घे,” नेटकऱ्याच्या सल्ल्यावर शाहरुख खानचं चोख उत्तर, म्हणाला…

चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे २० दिवस बाकी आहेत, त्यामुळे ट्रेलर कधी येणार, याबदद्ल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. चित्रपटाचा टीझर चर्चेत असताना ट्रेलर १० तारखेला लाँच केला जाईल असे निर्मात्यांनी सांगितले आहे.

Video: “जग काहीही बोललं तरीही मी…”; Boycott Pathan ट्रेंडदरम्यान शाहरुख खानचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटातून शाहरुख खान तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत पुनरागमन करतोय. यापूर्वी तो रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण, अब्राहम दिसणार आहेत. यशराज फिल्म्सचे याची निर्मिती केली आहे.