Pooja Hegde Networth : पूजा हेगडे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आणि बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने तेलुगू, तामिळ आणि हिंदी सिनेमात काम केलं आहे. तिने अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसह काम केलं आहे. परंतु, मोजक्या चित्रपटांत काम करूनही प्रेक्षकांमध्ये तिची लोकप्रियता जास्त आहे.

पूजा हेगडे साऊथ व बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रजनीकांत ते सलमान खान या लोकप्रिय कलाकारांसह तिने काम केलं आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का पूजा हेगडेची नेटवर्थ किती आहे? ती एका जाहिरातीचे तब्बल ४० लाख रुपये घेते. शिवाय मुंबईसारख्या शहरात तिचा आलिशान बंगलाही आहे.

पूजाला अभिनयासह नृत्याचीही आवड आहे. ती अनेकदा तिच्या फोटोशूटमुळेही अनेकांचं लक्ष वेधत असते. पूजाने २०१० मध्ये मिस युनिवर्स इंडिया हा खिताब मिळवला होता. यानंतर तिने तामिळ, तेलुगू आणि हिंदी सिनेमात काम करायला सुरुवात केली. पूजाने २०१२ मध्ये ‘मुगमुडी’ (Mugamoodi) या तामिळ चित्रपटातून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं आणि त्यानंतर तिच्या कारकि‍र्दीची सुरुवात झाली.

‘राधे श्याम’, ‘बिस्ट’ आणि ‘आचार्य’ या तिच्या अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पण, तिचं ‘रेट्रो’मधील ‘कानिमा’ आणि रजनीकांत यांच्या ‘कुली’मधील ‘मोनिका’ या गाण्यांमुळे ती खूप चर्चेत होती.

पूजा हेगडेची नेटवर्थ किती?

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार पूजा हेगडे प्रत्येक महिन्याला ५० लाख रुपये कमावते. ती एका जाहीरातीचे ४० लाख रुपये इतके पैसे घेते. अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर २७ मिलियन इतके फॉलोवर्स आहेत; तर ती एका चित्रपटासाठी ४ कोटी इतकं मानधन घेते. २०२५ मधील तिच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर जवळपास ५० कोटी इतकी तिची नेटवर्थ आहे.

५० कोटींच्या नेटवर्थव्यतिरिक्त पूजाचा मुंबईती सी फेसिंग आलिशान बंगलाही आहे, ज्याची किंमत ४५ कोटी इतकी आहे. यासह अभिनेत्रीचे मुंबईतीलच वांद्रे परिसरात ६ कोटींचं ३ बीएचके अपार्टमेंट आहे. हैद्राबाद येथेही तिचं घर असून त्याची किंमत चार कोटी इतकी आहे. याव्यतिरिक्त तिच्या गाड्यांच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर पूजाकडे आलिशान गाड्यांचं कलेक्शन असल्याचं पाहायला मिळतं.

पूजाकडे आहे महागड्या गाड्यांच कलेक्शन

पूजाने २०२३ मध्ये रेंज रोव्हर ही ४ कोटींची गाडी खरेदी केलेली. यासह तिच्याकडे Porsche cayenne ही २ कोटींची किंमत असलेली गाडीदेखील आहे. पूजाकडे याव्यतिरिक्त audi Q7 आणि जॅक्वॉर या दोन गाड्यादेखील आहेत. या व्यतिरिक्त अभिनेत्रीकडे महागड्या बॅगही असल्याचं पाहायला मिळतं. पूजाकडे Louis vuitton ही १.९१ लाखांची किंमत असलेली महागडी बॅगसुद्धा आहे आणि यासह तिच्याकडे १.३ लाख इतकी किंमत असलेली Christian Dior ही बॅगही आहे.

पूजा हेगडेच्या आगामी प्रॉजेक्टबद्दल बोलायचं झालं तर ती येत्या काळात शाहीद कपूरबरोबर ‘देवा’ चित्रपटातून झळकणार आहे. यासह ती थलापती विजयच्या Jana Nayagan या चित्रपटातूनही झळकणार आहे.