सध्या सगळीकडेच अभिनेत्री परिणीती चोप्रा व आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दिल्लीमध्ये या दोघांचा साखरपुडा आज थाटामाटात पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. शिवाय काही सेलिब्रिटी मंडळीही परिणीतीच्या साखरपुड्यासाठी दिल्लीला रवाना झाली आहेत. इतकंच नव्हे तर बहिणीच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्राही भारतात परतली आहे.

परिणीती व राघवच्या साखरपुड्याला कलाक्षेत्रासह राजकीय क्षेत्रातील मंडळीही हजेरी लावणार असल्याचं बोललं जात आहे. अशामध्येच आता प्रियांकाचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली विमानतळावरील प्रियांकाचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – राणादाने पाठकबाईंना किस करतानाचा फोटो शेअर केला अन्…; मराठमोळ्या जोडप्याच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

या व्हिडीओमध्ये ती डोक्यावर टोपी, गॉगल, टीशर्ट व पँट अशा लूकमध्ये दिसत आहे. दिल्ली विमानतळावरुन बाहेर येत असताना प्रियांकाबरोबर एक प्रकार घडला. यामुळे तिलाही राग अनावर झाला होता. प्रियांका विमानतळावरुन बाहेर येत असताना एका चाहत्याने तिच्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. तसेच प्रियांकाबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा – “तर मी माझ्या मुलीसाठी देशही सोडणार आणि…” लेक मालतीबाबत बोलताना प्रियांका चोप्राने केलेलं वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांकाबरोबर सेल्फी घेण्यासाठी या चाहत्याने केलेला प्रकार पाहून तिचाही राग अनावर झाला. तिच्या सुरक्षारक्षकांनी त्या व्यक्ती बाजूला करण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याने फोटोसाठी हट्ट धरला. दरम्यान प्रियांकानेही त्या चाहत्याकडे रागाने पाहिलं. प्रियांकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.