प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि अभिनेत्री नीलम उपाध्याय यांचा रोका नुकताच पार पडला. या सोहळ्याचे फोटोज प्रियांकाने तिच्या सोशल मीडियावर शेअर करून तिच्या भावाला आणि वहिनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियांकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर भाऊ सिद्धार्थ आणि नीलमचा फोटो शेअर करत लिहिले, “सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय तुम्हा दोघांचे मनापासून अभिनंदन. तुम्हाला आमचं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद.”

पुढच्या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा, नीक जोनास, सिद्धार्थ आणि नीलम एकत्र दिसत आहेत. यात प्रियांकाने लाल रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे. तर नीकने भारतीय पेहराव करत सफेद रंगाचा कुर्ता पायजमा आणि फिकट तपकिरी रंगाची कोटी घातली आहे. “हॅप्पी रोका, त्यांनी करून दाखवलं.” असं कॅप्शन प्रियांकाने या फोटोला दिलं.

नीलमने तिच्या इंस्टाग्रामवर रोका विधीचे फोटो पोस्ट केले. यावर प्रियांकाने इमोजीसह दोघांचे अभिनंदन केले तर मीरा चोप्राने लिहिले, ” तुम्ही सर्वात चांगली बातमी दिली आहे. तुम्हा दोघांसाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी मी खूप आनंदी आहे. खूप खूप अभिनंदन.”

सिद्धार्थ चोप्राचा आणि नीलम उपाध्याय यांच्या रोका विधीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नीलमच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या नऊ वर्षांत नीलमने तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘मिस्टर ७’, ‘उन्नोडू ओरु नाल’ असे अनेक साउथ चित्रपट तिने केले आहेत. २०१८ साली आलेल्या ‘तमाशा’ या तेलगू चित्रपटात ती शेवटची झळकली होती.