"हा अधिकार..." लग्नात बायकोकडून कुंकू लावून घेणाऱ्या राजकुमार रावचं वक्तव्य चर्चेत | rajkumar rao statement viral about his most famous photo from his wedding | Loksatta

“हा अधिकार…” लग्नात बायकोकडून कुंकू लावून घेणाऱ्या राजकुमार रावचं वक्तव्य चर्चेत

या दोघांनी गेल्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्न केलं

“हा अधिकार…” लग्नात बायकोकडून कुंकू लावून घेणाऱ्या राजकुमार रावचं वक्तव्य चर्चेत
राजकुमार राव (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींची लग्नं हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगले व्हायरल होतात. सामान्य लोकसुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करत असतात. मेहंदी, हळद, संगीतदरम्यानचे या स्टार्सचे फोटो चांगलेच व्हायरल होतात. बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष झालं आहे.

या दोघांनी गेल्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्न केलं होतं. यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यापैकी एका फोटोमध्ये पत्रलेखा ही राजकुमार रावच्या भांगेत कुंकू लावतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. यावरून बरीच चर्चादेखील झाली होती. याच फोटोबद्दल नुकतंच राजकुमार रावने वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा : “मला काळी मांजर आणि सावळी म्हणून…” बॉलिवूडमधील वर्णभेदावर प्रियांका चोप्राने ओढले ताशेरे

सोशल मीडिया स्टार जेनीसच्या युट्यूबवरील कार्यक्रमात राजकुमारने यावर टिप्पणी केली आहे. राजकुमार म्हणाला, “फक्त मीच का तिच्या भांगेत कुंकू लावायला हवं, हा हक्क महिलांना पण असायला हवा असं माझं मत आहे.” या मुलाखतीमध्ये राजकुमार रावने त्याच्या चित्रपटक्षेत्रातील अनुभवाबद्दल आणि आगामी चित्रपटांबद्दलही खुलासा केला आहे.

राजकुमारचा नुकताच ‘मोनिका ओह माय डार्लिंग’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे. शिवाय त्याचा ‘हीट द फर्स्ट केस’ हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेकही चांगलाच गाजला. याबरोबरच तो ‘भीड’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या आगामी चित्रपटातही झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 14:15 IST
Next Story
“आम्हाला मार्गदर्शन करण्याबरोबरच…” अनिल कपूर यांच्या ट्वीटनंतर जितेंद्र जोशीने शेअर केली भावूक पोस्ट