रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारस यश मिळालं नाही. चित्रपटातील विएफक्स आणि टायलॉगमुळे प्रेक्षकांची पसंती कमी मिळाली. अशात आता रामायणावर आधारित आणखी एका चित्रपटाची तयारी सुरू आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी रामायणावर आधारित चित्रपट करण्याची योजना करत आहे. यातील राम आणि सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा विचार केला जात आहे. पण आलियाच्या सीतेच्या भूमिकेवर रामायण मालिकेतील लक्ष्मण म्हणजे सुनील लहरी यांनी आक्षेप नोंदवला आहे.

हेही वाचा – विद्या बालनवर 5 स्टार हॉटेलसमोर आली होती भीक मागायची वेळ? अभिनेत्रीनं सांगितला ‘तो’ किस्सा

‘हिंदुस्तान टाइम्स’शी बातचित करताना सुनील लहरी म्हणाले की, “आलिया टॅलेंटेड आहे. पण तिने पाच वर्षांपूर्वी ही भूमिका साकारली असती तर या भूमिकेला न्याय मिळाला असता. हे माझं स्वतःचं विचार आहेत. मला असं वाटतं की, गेल्या काही वर्षात आलिया बदलली आहे. त्यामुळे आलिया सीतेच्या रुपात किती चांगली दिसेल हे माहित नाही.”

हेही वाचा – ए आर रेहमान: हिंदू ज्योतिषानं दिलीप कुमारला सुचवलं मुस्लीम नाव; रेहमान यांनी सांगितली आठवण…

तर रणबीर कपूरबाबत सुनील लहरी म्हणाले की, “रामाच्या भूमिकेसाठी रणबीर खूप चांगला पर्याय आहे. तो ही भूमिका उत्तमरित्या साकारू शकतो.”

हेही वाचा – ए आर रेहमान: हिंदू ज्योतिषानं दिलीप कुमारला सुचवलं मुस्लीम नाव; रेहमान यांनी सांगितली आठवण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माहितीनुसार, नितेश तिवारी यांच्या रामायणावरील आधारित या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु लवकरच या चित्रपटाची शूटिंग सुरू होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. शिवाय २०२५च्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.