Shazahn Padamsee Wedding: ‘दिल तो बच्चा है जी’ व ‘रॉकेट सिंग’ फेम बॉलीवूड अभिनेत्री शाजान पदमसीने लग्न केलं आहे. ३७ वर्षीय शाजान मागील अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. अखेर तिने व तिच्या बॉयफ्रेंडने लग्न करून नवीन प्रवासाची सुरुवात केली आहे. शाजानच्या मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नातील काही खास क्षण इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

३७ वर्षांची शाजान पदमसी व आशिष कनाकिया मागील काही वर्षांपासून डेट करत होते, आता त्यांनी लग्न केलं आहे. शाजानचे पती आशिष हे कनाकिया ग्रुपचे डायरेक्टर आणि मूव्ही मॅक्स सिनेमाचे सीईओ आहेत.

शाजान व आशिष यांनी २० जानेवारी २०२५ रोजी साखरपुडा केला होता. आता दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. शाजानच्या मित्रांनी लग्नातील काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ते तिने रिशेअर केले आहेत. शाजानने अद्याप तिच्या लग्नासंदर्भात पोस्ट केली नाही.

पाहा व्हिडीओ-

शाजान व आशिष यांची पहिली भेट

शाजान पदमसी व आशिषची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. “माझी आणि शाजानची ओळख माझ्या बालपणीच्या मित्राने करून दिली होती. मी पहिल्याच भेटीत आशिषकडे आकर्षित झाले होते. मात्र, मी घाई केली नाही. काही महिन्यांनंतर आम्ही दोघे डिनरवर भेटलो आणि नंतर आम्ही डेटिंग करू लागलो,” असं शाजानने सांगितलं होतं.

शाजानने तिच्यात व आशिषमध्ये काय साम्य आहे, ते सांगितलं होतं. “आम्ही दोघे एकत्र खूप हसतो आणि मस्ती करतो. तो माझ्यावर खूप विनोद करतो, आता मी हळूहळू ते जोक्स स्वीकारायला शिकले आहे. आशिष खूप काळजी घेणारा आहे. आम्ही दोघे पूर्णपणे वेगळ्या पार्श्वभूमीतून आलो आहोत,” असं शाजान म्हणाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाजान पदमसीचे करिअर

शाजान पदमसीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘हाउसफूल 2’, ‘ऑरेंज’, ‘कनिमोळी’, ‘मसाला’, ‘पागलपन नेक्स्ट लेव्हल’, ‘डिस्को व्हॅली’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शाजान व आशिषने यावर्षी साखरपुडा केला आणि आता लग्नबंधनात अडकले आहेत. या जोडप्याला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.