बॉलीवूडचा सुपस्टार रणबीर कपूर नेहमीच चर्चेत असतो. रणबीर आणि आलिया बी टाऊनमधील लोकप्रिय कपल मानले जातात. पण, आलियाशी लग्न करण्याअगोदर रणबीरला दुसरीच अभिनेत्री आवडत होती. करण जौहरच्या ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमातील रणबीर कपूरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आपल्या लग्नाच्या इच्छेबाबत बोलताना दिसत आहे.

हेही वाचा- Video : अभिनेत्री काजोलला मोबाईल पाहणं पडलं महागात, दुर्लक्ष झाल्याने तोल गेला अन्…

रणबीर कपूरचा हा व्हिडीओ ‘कॉफी विथ करण’ या शोमधील आहे. या व्हिडीओमध्ये करण रणबीर कपूरसोबत रॅपिड फायर राउंड खेळत आहे. ज्यामध्ये तो अभिनेत्याला अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे. करण रणबीरला विचारतो तुला कोणाबरोबर लग्न करायला आवडेल. रणबीर म्हणतो मला अनुष्काबरोबर लग्न करायला आवडेल, पण तिचं लग्न झालं आहे आणि ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर लवकरच त्याचा अॅनिमल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. या ट्रेलरला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात रणबीरबरोबर रश्मिका मंदाना आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.