बॉलीवूडचं सर्वाधिक चर्चेत असणारं जोडपं रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण. ‘रामलीला’ सिनेमाच्या सेटवर या दोघांचे सुत जुळले आणि २०१८ मध्ये हे जोडपं विवाहबंधनात अडकले. गेल्या सहा वर्षांच्या संसारानंतर आता या जोडप्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नुकतंच रणवीर आणि दीपिकाने त्यांचं मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.

दीपिकाने याआधी सोशल मीडियावर ती आणि रणवीर सप्टेंबर महिन्यात आई बाबा होणार असल्याचं पोस्ट करून सांगितलं होतं. दीपवीर शुभ कार्याआधी मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन घेतात. त्यांचं लग्न झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या संसाराची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनाने केली होती. आता त्यांच्या संसारात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनाआधी या जोडीने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.

हेही वाचा...दीप-वीर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

शनिवारी ( ७ सप्टेंबर) गणेश चतुर्थी असून त्याच पार्श्वभूमीवर रणवीर आणि दीपिकाने आपल्या कुटुंबीयांसमवेत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दीपिका हिरव्या रंगाच्या साडीत दिसत आहे, ज्यावर सोनेरी नक्षीकाम आहे, तर रणवीर सिंग पांढऱ्या कुर्त्यात दिसत आहे.

एका व्हिडीओमध्ये रणवीर आणि दीपिका आजूबाजूला असणाऱ्या लोकांना अभिवादन करत, सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेने आत जाताना दिसत आहेत. याच व्हिडीओच्या शेवटी रणवीर, दीपिकाचा हात धरून तिला मंदिरात नेताना दिसत आहे.

हेही वाचा...Photos : रणवीर-दीपिकाचं मॅटर्निटी फोटोशूट! अभिनेत्रीने पहिल्यांदाच फ्लॉन्ट केला बेबी बंप, फोटो एकदा पाहाच

दुसऱ्या एका व्हिडीओत रणवीर आणि दीपिका सिद्धिविनायक मंदिरातील आरतीत सहभाग घेताना दिसत आहेत. रणवीर आरतीत तल्लीन होऊन टाळ्या वाजवत आहे.

हेही वाचा…कंगना रणौत यांनी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; म्हणाल्या, “सेन्सॉर बोर्डाच्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दीपिका पदुकोण नुकतीच ‘कल्की २८९८ एडी’ या सिनेमात दिसली होती, तर ती ‘सिंगम अगेन’ या सिनेमात अजय देवगणबरोबर दिसणार आहे. रणवीर सिंग ‘डॉन ३’ या सिनेमात झळकणार आहे.