Ek Deewane ki Deewaniyat Box Office Collection Day 3 : सध्या बॉक्स ऑफिसवर ‘एक दिवाने की दिवानियत’ व ‘थामा’ या सिनेमांचा जलवा पाहायला मिळतोय. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे दोन्ही चित्रपट चांगली कामगिरी करत आहेत. २१ ऑक्टोबरला रिलीज झालेल्या ‘एक दिवाने की दिवानियत’ व ‘थामा’ने तीन दिवसांत किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.
आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. या हॉरर कॉमेडीने रिलीजच्या फक्त तीन दिवसांतच जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
थामा बॉक्स ऑफिस कलेक्शन
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘थामा’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी २४ कोटी कमावले. दुसऱ्या दिवशी थामाच्या कमाईत घसरण झाली आणि १८.६ कोटींचे कलेक्शन केले. थामाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी १२.५० कोटी कमावले. थामाचे तीन दिवसांचे कलेक्शन ५५.१० कोटींवर पोहोचले आहे.
थामाने कोणत्या चित्रपटांना टाकलं मागे?
थामाने काजोलच्या ‘मा’ सिनेमाच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकले आहे. ‘मा’ ने भारतात ३६.०८ कोटी आणि जगभरात ४९.७५ कोटी कमावले. आता थामा लवकरच वरुण धवनच्या ‘भेडिया’ ला मागे टाकेल. भेडियाने भारतात ६८.९९ कोटींचे कलेक्शन केले होते.
‘एक दिवाने की दिवानियत’ कलेक्शन
सनम तेरी कसम फेम हर्षवर्धन राणे व सोनम बाजवा यांच्या ‘एक दिवाने की दिवानियत’ने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी ९ कोटी कमावले, दुसऱ्या दिवशी ७.५ कोटी कमावले आणि तिसऱ्या दिवशी ६ कोटी रुपये कमावले. ‘एक दिवाने की दिवानियत’चे तीन दिवसांचे कलेक्शन २२.७५ कोटी रुपये झाले आहे.
‘एक दिवाने की दिवानियत’ या चित्रपटांना टाकलं मागे
‘एक दिवाने की दिवानियत’ने होमबाउंड (४.५७ कोटी), द बंगाल फाइल्स ९ (१९.५९ कोटी), निकिता रॉय (१.२८ कोटी), आंखों की गुस्ताखियां (१.८० कोटी), केसरी वीर (१.८८ कोटी), कंपकंपी (१.५० कोटी), द भूतनी (१२.५२ कोटी), फुले (६.७६ कोटी), ग्राउंड झिरो (७.७७ कोटी), क्रेझी (१४.०३ कोटी), सुपरबॉयज ऑफ मालेगाव (५.३२ कोटी), मेरे हसबंड की बीवी (१२.२५ कोटी), लव्हयापा (७.६९ कोटी) आणि इमर्जन्सी (२०.४८ कोटी) या चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकलं आहे.
एक दिवाने की दिवानियत व थामा दमदार कमाई करत आहेत. पण अजून वीकेंडला या चित्रपटांच्या कमाईत आणखी वाढ होईल अशी शक्यता आहे.
