बॉलिवूडमधील एकमेव चिरतरुण अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखा या नावाभोवती एवढं गूढ वलय निर्माण झालंय की त्यातून खुद्द रेखा आणि त्यांच्या चाहत्यांना बाहेर यायचं नाही हे स्पष्ट आहे. अद्वितीय सौंदर्य आणि त्या सुंदर चेहेऱ्यामागील बरीच गुपितं यासाठी रेखा यांची सर्वात जास्त चर्चा होते. अमिताभ बच्चनसह कित्येक कलाकारांशी नाव जोडलं गेलेलं असो किंवा स्वतःच्या भांगेत कुंकू भरणं असो, रेखा या ना त्या कारणामुळे चर्चेत असतातच.
रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल बरंच लिहिलं आणि बोललं गेलं आहे. त्यांचं वैवाहिक आयुष्याबद्दल आजही कित्येकांना कुतूहल आहे. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचं त्यांचं नातं साऱ्या जगाला ठाऊक आहे, याचप्रमाणे बऱ्याच वर्षांपूर्वी रेखा आणि बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार यांच्यात काहीतरी शिजतंय या चर्चेला उत आला होता. याबाबतीत मध्यंतरी बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिने खुलासा केला होता.
आणखी वाचा : विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या
१९९४ दरम्यान मोहरा चित्रपटात काम करताना रविना आणि अक्षयमध्ये जवळीक निर्माण झाली. दोघांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगू लागल्या. शिवाय या दोघांनी साखरपुडा केला असल्याचंसुद्धा रविनाने स्पष्ट केलं होतं. १९९६ च्या दरम्यान ‘खिलाडीयों का खिलाडी’ या चित्रपटात अक्षय कुमार बरोबरच रेखा यांनाही घेण्यात आलं होतं. चित्रपटात रेखा आणि अक्षयमध्ये बरेच बोल्ड सीन्स होते, शिवाय त्यातलं या दोघांवर चित्रीत केलेल्या एका गाण्यामुळे चांगलाच गदारोळ माजला होता.
‘रेडिट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रविनाने अक्षय आणि रेखा यांच्याबद्दल कानवार येणाऱ्या अफवांविषयी भाष्य केलं. रविना म्हणाली, “मला नाही वाटत अक्षयला रेखाविषयी काही वाटत होतं, तो रेखापासून शक्यतो लांबच राहायचा, त्याने रेखाला बरंच सहन केलं आहे. सेटवर असताना रेखाच त्याच्यासाठी घरून जेवणाचा डबा आणायची. त्यानंतर मात्र मी त्या दोघांच्या विषयात लक्ष घालणं बंद केलं.” यामुळेच पुढे जाऊन रविना आणि अक्षय यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याचं म्हंटलं जातं. नंतर अक्षयने ट्विंकलबरोबर लग्न केलं आणि रविनानेही नंतर उद्योगपती अनिल थंडानी यांच्याबरोबर संसार थाटला.