अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलीया देशमुख ही जोडी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हिंदी मनोरंजनसृष्टीत काम केल्यानंतर आता ती दोघं मराठी सिनेसृष्टीत काम करून प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. गेल्या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित झालेला ‘वेड’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट झाला. ते नेहमीच त्यांच्या वागणुकीमुळे चर्चेत असतात. आता अशातच त्यांचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

रितेश देशमुखने ‘वेड’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पाऊल टाकलं. तर अभिनेत्री जिनिलीया देशमुखने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटाची कथा, यातील कलाकारांचा अभिनय आणि या चित्रपटातील गाणी या सगळयालाच प्रेक्षकांना खूप चांगला प्रतिसाद दिला. आजही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे.

आणखी वाचा : Video: फोटोग्राफरने सर्वांसमोर ‘वहिनी’ हाक मारताच जिनिलीयाने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

रितेश आणि जिनिलीयाचा एक व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती दोघं एअरपोर्टवर दिसत असून मुंबईच्या बाहेर जात आहेत. तर यामध्ये एक छोटा मुलगा रितेशला थांबवतो आणि त्याच्याबरोबर ‘वेड’ या चित्रपटातील ‘वेड लागलंय’ या गाण्यावर नाच करण्याची मागणी करतो. रितेशही त्याची ती मागणी मान्य करतो. तो छोटा मुलगा मोबाईल घेऊन ते गाणं लावत असताना रितेश कोणतीही तक्रार न करता त्याच्या बाजूला उभा असलेला या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर जिनिलीया देखील त्यांच्यापासून थोडंसं लांब उभी आहे असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्या मुलाने ‘वेड लावलंय’ हे गाणं लावल्यानंतर रितेश आणि त्याचा हा छोटा चाहता विमानतळावरच त्या गाण्यावर ताल धरतात आणि नाच करून झाल्यावर रितेश जिनिलीयाबरोबर तिथून निघून जातो.

हेही वाचा : “आमच्या मुलांनी जर अपशब्द वापरले तर…” रितेश-जिनिलीयाने मांडलं स्पष्ट मत; म्हणाले, “आजच्या काळात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रितेश आणि जिनिलीयाचा साधेपणा आणि त्यांचा नम्रपणा पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. “असे बॉलीवूड कलाकार सिनेसृष्टीत असायला हवेत,” “यांच्याइतकं नम्र दुसरं कोणीही नाही,” असं म्हणत नेटकरी त्या दोघांचं कौतुक करत आहेत.