बालकलाकार म्हणून नावारूपास आलेली रिवा अरोरा सध्या फारच चर्चेत आहे. ‘उरी’,’गुंजन सक्सेना’, ‘भारत’ आणि ‘बंदिश बैंडिट्स’ यांसारख्या कलाकृतींमध्ये तिने केलेल्या कामाचे खूप कौतुक झाले. मात्र नुकत्याच करण कुंद्राबरोबरच्या एका गाण्यामुळे तिला सर्वजण ट्रोल करत आहेत. करण कुंद्रा आणि रिवाने अलिकडेच एका गाण्याचा व्हिडीओ शूट केला आहे. ज्याचं नाव ‘अखियां’ असं आहे. या व्हिडीओ १२ वर्षीय रिवा अरोरा करण कुंद्राबरोबर दिसत आहे.

हेही वाचा : “आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रीण आहोत पण…”, आकांक्षा पुरीचे मिका सिंगबद्दल आश्चर्यकारक विधान

या व्हिडीओमध्ये रिवा अरोरा एका अशा मुलीच्या भूमिकेत दाखवली गेली आहे, जी आपल्या बॉयफ्रेंडचा विश्वासघात करते आणि करण कुंद्राबरोबर रोमान्स करताना दिसते. या व्हिडीओमध्ये हे चित्रण दाखवल्यामुळे चाहते भडकले आहेत. त्यावरुन करण कुंद्रा आणि रिवाला टीकांना समोरे जावे लागत आहे.

अशातच त्या ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी रिवाने इंस्टाग्रामवर तिचा ग्लॅमरस मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. या फोटत तिने क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स परिधान केले आहे. हा फोटो सोशल मिडीआवर टाकत रिवाने तिला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “तिरस्कार ही तुम्हाला मिळू शकणारी सर्वोत मोठी कौतुकाची थाप आहे.”

आणखी वाचा : तेजस्वीने बॉयफ्रेंड करण कुंद्राला न सांगताच उरकला साखरपुडा? अभिनेता तिच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अखियां’ या गाण्याच्या व्हिडीओ रिलीज झाल्यावर प्रेक्षकांनी केवळ रिवा करण कुंद्रावरच नाही तर रिवा अरोराच्या पालकांवरही राग काढला. नेतकऱ्यांचे म्हणणे होते की, रिवा अजूनही लहान आहे आणि तिला अशा प्रकारे ऑनस्क्रीन लैंगिक किंवा रोमँटिक भूमिकांमध्ये दाखवणे योग्य नाही. पण आता ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देऊन ती ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही असे तिने स्पष्ट केले आहे.