६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार क्रिती सेनॉन आणि आलिया भट्ट यांना मिळाला आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर पहिल्यांदाच क्रितीला भेटली आणि यानिमित्त तिने खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री क्रिती सेनॉन हिला ‘मिमी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटामध्ये तिने सरोगेट मदरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्यामुळे खास मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली. त्यामुळे क्रितीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा सईलाही खूप आनंद झाला आहे.

आणखी वाचा : “सहा महिने एकत्र राहतो आणि सहा महिने वेगळं, कारण…,” आईबरोबरच्या नात्याबद्दल सई ताम्हणकरचा मोठा खुलासा

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने नुकतंच एक गेट-टुगेदर केलं. यावेळी क्रिती, सई आणि काही टीम मेंबर उपस्थित होते. या वेळेचे काही फोटो सईने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले. या फोटोमध्ये सई या सर्वांबरोबर पोज देताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, “इतक्या मोठ्या बहुमानासाठी आणि यशासाठी खूप खूप अभिनंदन माझी सुंदरी. आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. पंकज त्रिपाठीजी आम्ही तुमची खूप आठवण काढली. तुमचं खूप खूप अभिनंदन सर. तुमच्याकडून नेहमीच खूप शिकत आलो आहोत आणि यापुढेही शिकत राहू.”

हेही वाचा : सई ताम्हणकरने थकवले मित्राचे हजारो रुपये, म्हणाली, “त्याच्या वशिल्याने मी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर आता सई ताम्हणकरची ही पोस्ट खूप व्हायरल होत असून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर तिच्या आणि क्रितीमधील बॉण्डिंगचंही खूप कौतुक करत आहेत.