अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या हल्ल्यात त्याला चाकूने भोसकण्यात आले होते . त्यानंतर सैफ अली खानला एका ऑटोरिक्षा चालकाच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले. या मदतीबद्दल एका समाजसेवकाने त्या रिक्षाचालकाला बक्षीस दिले आहे. 

१६ जानेवारी २०२५ रोजी रात्री घडलेल्या या घटनेत जखमी झालेल्या सैफला त्याचा मुलगा तैमूरबरोबर लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्याला भजन सिंग राणा नावाच्या एका रिक्षाचालकाने रुग्णालयात पोहोचवले. 

या सहकार्याबद्दल समाजसेवक फैजान अन्सारी यांनी भजन सिंग राणा यांना ११,००० रुपयांचे रोख बक्षीस दिले. IANS या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, रिक्षाचालकाने याबद्दल अभिमान व्यक्त करताना सांगितले की, “माझ्या आयुष्यात कधीही अशी गोष्ट घडेल असं मला वाटलं नव्हतं. या सन्मानामुळे मला खूप आनंद झाला आहे.” 

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना, उत्तराखंडचे रहिवासी असलेल्या राणा यांनी ते सैफला वेळेत रुग्णालयात घेऊन जाऊ शकले म्हणून आनंद व्यक्त केला. त्यांनी पुढे सांगितले, “जर सैफ मला भेटायचे ठरवतील, तर मी नक्कीच त्यांना भेटेन. जर त्यांना मला काही भेट द्यायची असेल आणि त्यांना त्यात आनंद वाटत असेल, तर मी नकार कसा देऊ शकेन?” 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सैफ अली खान आता बरा होत आहेत. त्याचे मित्र आणि कुटुंबीय सतत त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात येत आहेत. त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. सैफवर हल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर ऊर्फ विजय दास याला रविवारी अटक करण्यात आली. आरोपीने सुरुवातीला तो कोलकाता रहिवासी आहे, असे असल्याचे असे सांगितले होते. पण पोलीस तपासात तो बांगलादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाले.