अभिनेता सैफ अली खान अलीकडच्या अनेक चित्रपटांतील भूमिकांमुळे चर्चेत आहे. बिग बजेट असलेला ‘आदिपुरुष’ गेल्या वर्षी १६ जूनला प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. ‘आदिपुरुष’मधील संवादामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटात साउथ स्टार प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनॉन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

६०० कोटी बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या अपयशाबद्दल आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांबद्दल लेखक-गीतकार मनोज मुनताशीर शुक्ला यांच्याशिवाय कोणीही जाहीरपणे बोलले नाही. परंतु, प्रदर्शनानंतर अवघ्या ७ महिन्यांनी अभिनेता सैफ अली खानने मौन सोडलं.

हेही वाचा… VIDEO: हातात बॅट अन्…; शाहिद कपूरने विराट कोहलीची नक्कल करत बनवला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

फिल्म कंपेनियनला दिलेल्या मुलाखतीत सैफने याबाबत खुलासा केला. तो म्हणाला, तो स्वत:ला इतका मोठा स्टार समझत नाही की त्याचे सगळेच प्रोजेक्ट्स हिट ठरतील. नवदीप सिंग दिग्दर्शित ‘लाल कप्तान’ २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. याचं उदाहरण देतं सैफ म्हणाला, “हा चित्रपट प्रदर्शित झाला त्याचं दिवशी या चित्रपटाने ५० लाखांची कमाई केली.”

‘आदिपुरुष’ च्या अपयशाबाबत सांगताना सैफ म्हणाला, “मी एवढाही मोठा स्टार नाही की माझ्या प्रत्येक कलाकृतीला नेहमीच यश येईल.”

हेही वाचा… आलिशान बंगला सोडला, लक्झरी गाडी विकली, चित्रपटसृष्टीपासूनही दूर; अभिनेता इम्रान खान सध्या करतोय तरी काय?

सैफ पुढे म्हणाला, “वास्तववादी असणं खरचं छान आहे, मी स्वत:ला कधीच स्टार समजलो नाही. मला स्टार व्हायला आवडतं परंतु मला भ्रमात राहायचं नाही. माझे आई वडील खूप मोठे कलाकार असले तरीही साधे सरळ आणि सामान्य आहेत. जीवनात वास्तव दाखवण्याऱ्या गोष्टी बऱ्याच आहेत आणि माझं नेहमी अशा गोष्टींकडे लक्ष असतं. अपयशाची भीती बाळगण्याची काहीच गरज नाही. ‘आदिपुरुष’चं उदाहरण द्यायचं झालं तर लोक म्हणतात, “ही निवड खूप धाडसी होती. ” लोकं जोखिम घेण्याबद्दल बोलतात, जरी तुम्ही कोणत्याही गोष्टीत अपयशी ठरलात तरीही ती जोखिम नसते. तुमच्याकडे असं अपयश असणंही आवश्यक असतं आणि हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा एक भाग आहे. अपयशासाठी नक्कीच तुम्हाला वाईट वाटेल पण हा चांगला प्रयत्न होता असं म्हणत पुढे जातं राहायचं.”

दरम्यान, ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनॉन यांच्यासह देवदत्त नागे आणि तेजस्वीनी पंडित हे मराठमोळे कालाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan for the first time opened up about adipurush controversies dvr
First published on: 08-02-2024 at 16:50 IST