बॉलीवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या वेगळ्या लूकमुळे चर्चेत आहे. सलमान खान ‘टायगर ३’ या चित्रपटात शेवटचा झळकला होता. संपूर्ण भारतात सलमानचे लाखो चाहते आहेत आणि ते सलमानला भेटण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. अशातच बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान अलीकडेच मुंबई विमानतळावर दिसला होता. विमानतळाबाहेर भेटलेल्या चाहत्यांबरोबर भाईला हसताना पाहण्याचा तो क्षण दुर्मीळ होता.

सलमानने त्याच्या काही चाहत्यांना मिठी मारली आणि विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मनापासून स्वागत केले. यावेळी तो खूप चांगल्या मूडमध्ये दिसत होता. विमानतळावर सलमानने राजकारणी बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा जीशान यांचीही भेट घेतली.

हेही वाचा… फक्त ९९ रुपयांमध्ये पाहता येणार तुमच्या आवडीचा चित्रपट; ‘सिनेमा लव्हर्स डे’च्या निमित्ताने आहे खास ऑफर

एअरपोर्ट लूकसाठी सलमानने विशेष आऊटफिटची निवड केली होती. अमिरी जॅकेट, ट्राउजर्स आणि कॅप अशा स्पोर्टी लूकमध्ये सलमान हटके दिसत होता. यात विशेष गोष्ट अशी की, त्याच्या ट्राउजर्सच्या मागच्या बाजूला त्याच्या चेहऱ्याची पेंटिंग होती. त्याच्या पॅँटवर असलेली ही कलाकृती पाहून पापाराझीदेखील उत्सुक होते. सलमानसह शेराही होता, जो अनेक वर्षांपासून अभिनेत्याचा सुरक्षारक्षक आहे. अभिनेत्याच्या या लूकचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये एका चाहत्याने लिहिले, “त्याच्या ड्रेसिंग सेन्सकडे पाहा, हा आऊटफिट त्याच्यावर किती सुंदर दिसत आहे.” दुसऱ्या चाहत्याने मजेशीररित्या म्हटले, “आयला दोन दोन भाई.”

२०२३ या वर्षाची सुरुवात सलमानने ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने केली, यात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेवढी चांगली कामगिरी करू शकला नाही. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘टायगर ३’ ने बॉक्स ऑफिसवर रु. २८५.५२ कोटी कमाई केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… ‘या’ कारणामुळे शाहिद कपूरने सोडलं धूम्रपान; म्हणाला, “माझ्या मुलीपासून लपून मी…”

सलमान खानच्या पुढील चित्रपटांबद्दल सांगायचं झाल्यास, असा अंदाज वर्तवला जात आहे की, सलमान धर्मा प्रोडक्शचा आगामी चित्रपट ‘द बुल’मध्ये दिसणार आहे. सूरज बडजात्याच्या पुढील चित्रपटातही तो काम करेल असा अंदाज आहे.