सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुचर्चित चित्रपट ‘टायगर ३’ अखेर प्रदर्शित झाला. ‘टायगर ३’च्या धमाकेदार ट्रेलरनंतर प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली होती. दरम्यान, सलमानच्या चाहत्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये चाहते चक्क चित्रपटगृहात फटाके फोडताना दिसत आहेत.
हेही वाचा- घटस्फोटानंतरही पूर्वाश्रमीच्या पत्नीला डेट करतोय बॉलीवूड अभिनेता; म्हणाला, “आमचं वैवाहिक जीवन…”
प्रेक्षकांमध्ये ‘टायगर ३’ची मोठ्या प्रमाणात क्रेझ बघायला मिळत आहे. सलमान खानच्या एन्ट्रीवर प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवत चित्रपटगृह दणाणून सोडले होते. एवढेच नाही तर काहींनी थेट चित्रपटगृहातच फटाके फोडले. त्याचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये सलमानचे चाहते चित्रपटगृहात फटाके फोडताना दिसत आहेत. टायगरच्या एन्ट्रीचा सीन पडद्यावर दिसत आहे. चित्रपटात टायगरची एन्ट्री होताच प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच फटाके फोडायला सुरुवात केली. संपूर्ण चित्रपटगृह फटाक्यांच्या धुराने भरून गेले होते. अचानक फुटणारे फटाके बघून प्रेक्षक घाबरले आणि घाबरून ते इकडे-तिकडे पळताना दिसले. हा व्हिडीओ नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील असल्याचा सांगण्यात येत आहे.
पहिल्याच दिवशी ‘टायगर ३’ ची बंपर कमाई
‘सॅकनिल्क”च्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार ‘टायगर ३’ने पहिल्या दिवशी ४४.५० कोटींची कमाई केली आहे; तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सोमवारी (१३ नोव्हेंबरला) चित्रपट जवळपास २५ कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे. ‘टायगर ३’ची दोन दिवसांतील कमाई पाहता, केवळ तीन दिवसांमध्येच चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठू शकतो.
हेही वाचा- ‘टायगर ३’ ची दणक्यात सुरुवात, सलमान-कतरिनाच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावले ‘तब्बल इतके कोटी
‘टायगर ३’मध्येही प्रेक्षकांना सलमान आणि कतरिनाचा अॅक्शन लूक बघायला मिळत आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीने खलनायकाची भूमिका साकारली आहे. इमरानच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. सलमान आणि करतरिनाप्रमाणेच इमरानचेही या चित्रपटात अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहेत. ‘टायगर ३’ हिंदीबरोबर तमीळ व तेलुगूमध्येही प्रदर्शित झाला आहे.